28 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीयराहुल गांधीच भावी पंतप्रधान, बावनकुळेंसमोर तरूणाने दिले उत्तर

राहुल गांधीच भावी पंतप्रधान, बावनकुळेंसमोर तरूणाने दिले उत्तर

देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून भाजपकडून आतापासूनच जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. तर इतर पक्षही त्याच मार्गावर आहेत. येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी भाजप २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासून करत असून महाराष्ट्राकडे अधिक लक्ष ठेऊन आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याने राज्यात काही दिवसांपासून निवडणूक आढावा बैठक घेत आहेत. या बैठकीच्या माध्यमातून भाजपची पावले आता हळू हळू प्रचाराकडे वळू लागली आहेत. राज्यभर दौरे करत असताना जनतेच्या मनातील प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न बावनकुळे करत आहेत.

काही दिवसांपासून राज्यात चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील कानाकोपऱ्यात दौरे करत आहेत. देशाच्या आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राज्यातील भाजपचा प्रदेशाध्यक्ष आपली चोख भुमिका पार पाडत आहेत. अशातच आता महाराष्ट्रात भाजप विरोधी पक्षांच्या मतदारसंघात निवडणुक बैठकीचा आढावा घेत आहेत. आतापर्यंत बावनकुळे हे बारामती, ठाणे, मावळ मतदारसंघात जाऊन त्यांनी भाजपचा प्रचार केला आहे. सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामती जिंकण्याबाबत वक्तव्य केले होते. बारांमती मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादीचे पारडे जड पाहायला मिळाले होते. मात्र आता राष्ट्रवादीत फुट पाडून अजित पवारांना सोबत घेऊन बारामती मिळवण्याकडे भाजपचे लक्ष आहे. तर दुसऱ्या  बाजूला ठाण्यात पार पडलेल्या बैठकीत भावी मुख्यमंत्री कोण हवाय? असा प्रश्न विचारला असता, देवेंद्र फडणवीस…असा आवाज येऊ लागला. तर आता बावनकुळे हे एका ठिकाणी गेले असता त्यांनी लोकांच्यात जाऊन संवाद साधला, यावेळी त्यांनी भावी पंतप्रधान कोण? असा प्रश्न विचारला असता, एका युवकाने थेट उत्तर दिले.

हेही वाचा 

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळणार ‘भाऊबीज भेट’

गाझा हॉस्पिटल हल्ल्यासाठी हमासच जबाबदार! इस्राईलने दिले पुरावे..

गाझा हॉस्पिटल हल्ल्यासाठी हमासच जबाबदार! इस्राईलने दिले पुरावे..

बावनकुळेंच्या प्रश्नावर तरूणाचे थेट उत्तर

बावनकुळे आगामी निवडणुकांसाठी जनमानसात फिरत आहेत, लोकांसोबत संवाद देखिल साधत आहेत. यावेळी बावनकुळेंनी एका तरूणाला भावी पंतप्रधान कोण हवाय? असा प्रश्न केला असता तरूण राहुल गांधी म्हणत बावनकुळेंवर उत्तरला आहे. या घडलेल्या प्रसंगाची चर्चा सोशल मिडियीद्वारे होत आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ आता कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर ट्वीट केला आहे. यामध्ये पटोलेंनी बावनकुळेंवर ट्वीटद्वारे मिश्कील टिका केली आहे.

नाना पटोलेंचे ट्वीट 

चंद्रशेखर बावनकुळेंनी तरुणाला भावी पंतप्रधान कोणाला पाहायचे असे विचारलेल्या प्रश्नावर नाना पटोलेंनी यावर ट्वीट करत लिहले आहे. ‘भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जनतेमध्ये जाऊन 2024 मध्ये पंतप्रधान म्हणून कोणाला पाहायचे आहे हे विचारत आहेत……. आणि जनतेतून उत्तर येते राहुल गांधी’, असे ट्वीट करत नाना पटोलेंनी बावनकुळेंवर मिश्कील टिपण्णी केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी