31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयरश्मी ठाकरेंच्या निकटवर्तीय शिंदे गटाच्या गळाला

रश्मी ठाकरेंच्या निकटवर्तीय शिंदे गटाच्या गळाला

राज्यात शिवसेना पक्षात फुट पडून वर्ष झाले तरीही ठाकरे गटाचे काही नेते हे शिंदे गटात प्रवेश करत आहेत. काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कानाल देखील शिंदे गटात गेले आहेत. एवढेच नाही तर खासदार गजानन कीर्तिकरांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला होता. यामुळे शिवसेना ठाकारे गटामध्ये पोकळी निर्माण झाली आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या निकटवर्तीय मीनाताई कांबळी यांनी देखील आता शिंदे गटात प्रवेश केला असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाच्या आऊटगोइंगमध्ये वाढ होऊ लागली आहे.

आगामी निवडणुकांचे वारे आताच वाहू लागले आहेत. यामुळे आता नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इनकमिंग आणि आऊटगोइंग करताना दिसत आहेत. गेल्या वर्षभरात शिवसेनेचे दोन गट झाले. 40 आमदार आणि एकनाथ शिंदेंनी भाजपशी युती करून सत्ता स्थापन केली आहे. दरम्यान आता ठाकरे गटातून महिला उपनेत्या मीनाताई कांबळे यांनीच रश्मी ठाकरे यांची साथ सोडली असून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या डोकेदुखीत आणखी वाढ होऊ लागली आहे.

हेही वाचा

आरटीओच्या बदल्यामधील गैरव्यवहाराला बसणार चाप, बदल्या आता ऑनलाईन

पांडुरंग बरोरांनी केली मुख्यमंत्र्यांची कोंडी

एम्स हॉस्पिटल प्रकरणाबाबत अतुल लोंढेंनी अमित शहांना सुनावली खरी खोटी

रश्मी ठाकरे ठाण्यात नवरात्रौत्सवासाठी गेल्या आहेत, अशावेळी मीनाताई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का लागला आहे. मीनाताई या रश्मी ठाकरेंच्या निकटवर्तीय होत्या. रश्मी ठाकरेंच्या सर्व दौऱ्यांचे काम मीनाताई करत होत्या. मेळावे घेण्यात, शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा हात होता. मात्र त्यांनी ठाकरे गटाला राम राम ठोकला असून त्यांच्या जाण्याने शिंदे गटातील काही महिला नेत्यांनी रश्मी ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले आहेत.

शिंदे गटाच्या महिला नेत्या रश्मी ठाकरेंवर आक्रमक 

रश्मी ठाकरे ठाणे दौऱ्यावर गेल्या असून ठाकरे गटाच्या उपनेत्या शिंदे गटात गेल्याने ठाणे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, रश्मी ठाकरे स्टंट करण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्याच पक्षातील नेत्या आता आमच्या पक्षात आल्या आहेत. ठाण्यात येऊन बाहेरच्या लोकांसोबत त्यांनी देवीच्या आरत्या केल्या. पण देवीची आरती ही फक्त दोन वेळा होते. एक सकाळी आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी, त्या दुपारी आरती करतात म्हणून देवी त्यांना पावली नाही, अशी खोचक टीका केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी