28 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरमहाराष्ट्र'आम्हाला संपवून टाकाल का?' फडणवीसांच्या टीकेवर सुषमा अंधारेंचा सवाल

‘आम्हाला संपवून टाकाल का?’ फडणवीसांच्या टीकेवर सुषमा अंधारेंचा सवाल

नाशिक ड्रग्स रॅकेट प्रकरणातील आरोपी ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बुधवारी, (18 ऑक्टोबर) बंगळुरूमधून अटक केली. त्याआधी शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी ललित पाटीलच्या फरार होण्यामागे सरकारमधील काही मंत्र्यांचा हात असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर, ललित पाटीलच्या अटकेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना ‘आता बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील,’ असा इशारा दिला होता. यावर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. सुषमा अंधारे यांनी यावेळी सरळ फडणवीसांना टार्गेट करून, “तोंड बंद कराल म्हणजे आम्हाला संपवुन टाकाल का?” असा सवाल केला आहे.

शिवसेना उद्धव बाळसाहेव ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे ह्या नाशिक ड्रग्स रॅकेट प्रकरणात चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. नाशिक ड्रग्स रॅकेट प्रकरणाची सखल चौकशी करून राज्य सरकारमधील मंत्री असलेले दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांचा या प्रकरणात समावेश आहे का? असा सवाल त्यांनी केला होता.


त्यानंतर, मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “ललित पाटील याची चौकशी होणार असून चौकशीतून सगळं बाहेर येईल. या कारवाईतून एक मोठ ड्रग्सचं जाळं बाहेर येईल आणि बोलणाऱ्यांची तोंड बंद होतील.”


फडणविसांच्या व्यक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की, बोलणाऱ्यांची तोंडं बंद होतील. हा इशारा आहे की धमकी आहे? तोंडं बंद कराल म्हणजे काय कराल? संपवून टाकाल का? की मलिक, देशमुख आणि राऊतांना अडकवलं तसं मला अडकवाल? अडकवाल तर कशात अडकवाल? मी आयुष्यभर संवैधानिक भाषा सांगत आली आहे. आयुष्यभर कायदे आणि कलमं याशिवाय काहीही बोललेले नाही. तुम्ही मला अडकवलं तर कशात अडकवाल?”

हे ही वाचा 

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या डोक्यावर कुणाचा हात?

ड्रग्जमाफिया ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक, ड्रग्जच्या रॅकेटचे गूढ उलगडणार?

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात फडणवीसांचे आव्हान

“देवेंद्र फडणवीस हे विसरत आहेत की, ते एका पक्षाचे नेते नसून ते या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत. या राज्यातील प्रत्येक नागरिकाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यांचं आणि माझं काही शत्रुत्व आहे असं त्यांना का वाटत आहे?” असा सवाल सुषमा अंधारेंनी केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी