31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयमंत्रालयाबाहेर थाटू संसार, गोपीचंद पडळकरांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

मंत्रालयाबाहेर थाटू संसार, गोपीचंद पडळकरांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी राज्यात संप पुकारला आहे. एसटी महामंडळचे राज्य सरकारी विभाग म्हणून विलीनीकरण करण्याच्या मुख्य मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे (Gopichand Padalkar criticizes Thackeray government).

पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरून ठाकरे आणि मविआ सरकारवर घणघोर टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास १० नोव्हेंबर रोजी आपण मंत्रालया बाहेर आंदोलन करणार असा इशाराच पडळकरांनी सत्ताधाऱ्याना दिला आहे.

Gopichand Padalkar : ‘तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबर्‍या अन् चमचा म्हणू शकतो पण…’ पडळकरांचे संजय राऊतांना खरमरीत पत्र

Gopichand Padalkar : आरक्षण मिळू नये, म्हणून मराठा- कुणबी आणि धनगर-आदिवासी समाजात भांडण लावण्याचा काही लोकांचा प्लॅन! गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात जवळपास ५९ आगारांमध्ये संप पुकारण्यात आला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जवळपास ३१ मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या ३१ जणांपैकी तीन कर्मचाऱ्यांचे प्राण देवाच्या कृप्रेने वाचले. परंतु, २८ कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले, तरी ठाकरे सरकारचा अबोला सुटत नाही आहे. असा आरोपच गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Gopichand Padalkar : आमदार गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

BJP-fuelled staff strike bleeds MSRTC coffers

एसटी कर्मचाऱ्यांचे अश्रू पुसणं तर सोडा, साधे दोन ओळींचे सांत्वनाचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पाठवले नाही. मराठी माणसाच्या भरवश्यावर राजकारण करायचे आणि त्याच्या संकटाच्या वेळी त्याला आणि त्याच्या परिवाराला वाऱ्यावरती सोडायचे. हाच यांचा मराठी बाणा आहे अशी टिका पडळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी