काही दिवसांपासून पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरु आहे. याचे विपरीत परिणाम हे जागतिक पातळीवर होताना दिसत आहेत. जगभरातून काही देश हे इस्रायलला पाठिंबा देत आहेत तर कोणी पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे. यावर आता भाजपचे नेते विनोद तावडेंनी शरद पवारांवर टीका केली आहे. तर याच टीकेला पाठिंबा देत आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर मिश्कील टिपण्णी केली आहे. गोपीचंद पडळकर हे शरद पवारांवर टीका करायला मागे पुढे पाहत नाही. त्यांनी काही दिवसांपूर्वीच लबाड लांडगा अशी टीका केली होती.
विनोद तावडेंचे ट्वीट
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी हे इस्रायलच्या पाठिशी उभे राहिले आहेत, यावर यांनी टीका केली आहे. मात्र त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे, की सध्या जगात सुरू असणारी लढाई ही दहशतवाद आणि दहशतवादविरोधी राष्ट्रे यांच्या दरम्यान सुरू आहे. अशावेळी दहशतवादी देशाविरोधात उभे राहून इस्रायलला पाठिंबा देणे क्रमप्राप्तच आहे. मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, २६/११ चा दहशतवादी हल्ला यांसारख्या घटना, त्यामध्ये किती लोक बळी गेले, हे सर्व शरद पवार यांनी आठवावे. असे असतानाही शरद पवार दहशतवादी देशांच्या पाठीशी का उभे राहत आहेत? हे सर्व मतांच्या राजकारणासाठी सुरू आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे, हे जनता जाणतेच! भाजपचे नेते विनोद तावडेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांवर ट्वीटच्या माध्यामातून टीका केली आहे. आता यावर गोपीचंद पडळकर यांनी ट्वीट करत शरद पवारांवर टीका केली आहे.
कदाचित घरातल्या एका खासदारामुळे स्वतःला भारताचे पंतप्रधान असल्याचा भास झाला असेल. त्यातूनच ही पॅलस्टाईन-इस्त्राईल बाबतची भूमिका जागतिक नेते शरदचंद्र पवार यांनी मांडली असावी. https://t.co/5igZQRydqm
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 20, 2023
गोपीचंद पडळकरांचे ट्वीट
भाजपचे नेते विनोद तावडेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांवर ट्वीटच्या माध्यामातून टिका केली. याच ट्वीटला पाठिंबा देत गोपीचंद पडळकर शरद पवारांवर टिका करत म्हणाले, कदाचित घरातल्या एका खासदारामुळे स्वतःला भारताचे पंतप्रधान असल्याचा भास झाला असेल. त्यातूनच ही पॅलेस्टाईन-इस्त्राईल बाबतची भूमिका जागतिक नेते शरदचंद्र पवार यांनी मांडली असावी.