28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरमहाराष्ट्रभारत-पाकिस्तान सीमेजवळ शिवछत्रपतींचा पुतळा

भारत-पाकिस्तान सीमेजवळ शिवछत्रपतींचा पुतळा

प्रत्येक मराठी माणूस आणि प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने पुढे येईल, अशी बातमी आम्ही तुम्हाला सांगत आहोत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले तरी आपल्या चेहऱ्यावर तेज झळकते, आपली छाती फुलून येते, आनंद गगनात मावेनासा होते. म्हणून आताच्या बातमीनेही तुम्हाला अमाप आनंद होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जम्म-काश्मीरमधील कुपवाडामध्ये उभारला जाणार आहे. हा शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा आज सन्मानपूर्वक काश्मीरला पाठवण्यात आला. कुपवाडामधील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंट आता शिवरायांच्या या पुतळ्याची स्थापना करणार आहे. ज्या वाहनाने हा पुतळा काश्मीरला पाठवण्यात आला त्या वाहनाला राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समारंभपूर्वक रवाना केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले किंवा त्यांचा पुतळा पाहिला तरी स्फुर्ती येते. काश्मीरमधील कुपवाड जिल्ह्यात दहशतवाद्याकडून कायम धोका असतो. आपले सैनिक प्राण तळहातावर घेऊन दहशतवाद्यांशी लढत असतात. आता शिवरायांच्या पुतळ्यामुळे या सैनिकांना शिवछत्रपतींच्या शौर्याचे कायम स्मरण होईल. ‘आम्ही पुणेकर फाउंडेशन’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती यांनी हा शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा बनवला असून कुपवाडा येथील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटकजे स्थापनेसाठी सुपूर्द केला आहे.

राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत शिवछत्रपतींचा पुतळा राजभवनमधून काश्मीरच्या दिशेने समारंभपूर्वक रवाना करण्यात आला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन तसेच रथपूजन करण्यात आले. अनेक राजांनी स्वतःसाठी राजमहाल बांधले. परंतु शिवरायांनी राजमहाल न बांधता राज्याच्या रक्षणासाठी गडकिल्ले बांधले. शिवाजी महाराजांच्या नावातच शक्ती आहे. महाराजांचे नाव घेऊन आपण प्रतापगडावर साडेपाचशे पायऱ्या चढून गेलो, असे राज्यपालांनी यावेळी आवर्जून सांगितले.

शिवरायांच्या पुतळ्यामुळे सीमेवरील जवानांना हजार हत्तींचे बळ लाभेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. एवढेच नाही तर कुपवाडा येथील महाराजांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू दिल्या जाणार नाही, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा

‘सुषमा अंधारे यांचा लवकरच…’ मोहित कंबोज यांचा धमकीवजा इशारा

मराठा-कुणबी एकच; फूट पाडणाऱ्यांना जरांगेंनी सुनावले

धनंजय मुंडेंनी सांगितले उद्धव ठाकरेंचे पाप!

दरम्यान, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. लंडनमध्ये लोकवर्गणीतून शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे मुनगंटीवारर यांनी सांगितले. तसेच शिवाजी महाराजांची  वाघनखे लवकरच शिवप्रेमींच्या दर्शनासाठी राज्यात  येतील, अशीही माहिती त्यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी