32 C
Mumbai
Friday, November 17, 2023
घरक्राईमनाशिक ड्रग्ज प्रकरण: आठ किलो सोन्याची खरेदी करणारा 'तो' कोण?

नाशिक ड्रग्ज प्रकरण: आठ किलो सोन्याची खरेदी करणारा ‘तो’ कोण?

नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाला दिवसेंदिवस वेगवेगळे वळण लागत आहे. ‘मंत्री दादा भुसे यांनी ललित पाटील याला मातोश्रीवर नेले होते,’ असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला केला असे असताना, नाशिकमधील सराफ पोलिसांच्या रडारवर आल्याचे समोर आले आहे. ललित पाटील ड्रग्सप्रकरणी सराफाची चौकशी होणार आहे. ड्रग्जच्या पैशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने नाशिकमधून सोने खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित सराफ व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलने येथील सराफ व्यावसायिकाकडून सोने खरेदी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तब्बल आठ किलोचे सोने खरेदी केले असून यापैकी 3 किलो सोने हस्तगत, उर्वरित 5 किलो सोने जप्त करणे बाकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

नाशिकच्या  ड्रग्ज प्रकरणात राज्यातील तीन पोलिसांच्या टीम्स लक्ष घालत असल्याने वेगवगेळ्या ठिकाणाहून नवी माहिती समोर येत आहे. कालच संजय राऊत यांच्या नेतृत्वाखालची नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी संजय राऊत यांनी स्थानिक आमदारांना हफ्ते जात असल्याने प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे हळूहळू हे प्रकरण उलगडत आहे.

अशातच एक माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिकमधील सराफाचा हात असल्याचे समोर आले असून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलने येथील सराफाकडून  सोने खरेदी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तब्बल आठ किलोचे सोने खरेदी केले असून यापैकी 3 किलो सोने हस्तगत, उर्वरित 5 किलो सोने जप्त करणे बाकी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान आता नाशिकचा सराफ  पोलिसांच्या रडारवर असून त्याच्याकडून ड्रग्जच्या पैशातून भूषण पाटीलने सोने खरेदी केल्याचे उघड झाले आहे. आठ किलो सोने खरेदी करून तो पसार झाला होता. आता पोलिसांनी संबंधित आठ किलो सोन्यापैकी 3 किलो सोने हस्तगत केले असून उर्वरित 5 किलो सोने जप्त करणे बाकी आहे. हे उर्वरित सोने कुठे लपवले याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकच्या कोणत्या सराफाकडून सोने खरेदी केले, याची चौकशी सुरू असून ललित पाटीलचे सराफ व्यावसायिकासोबतचे कनेक्शन उघड होणार आहे.

आतापर्यंतच्या चौकशीत ललित पाटील हा आंतरराज्यातून आंतरराष्ट्रीय पातळीवर ड्रग्जचा विस्तार करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांच्या संपर्कात होता, अशी माहिती त्याच्या कॉल रेकॉर्डिंगवरून समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हाय प्रोफाइल ड्रग्ज बनवून तो इंटरनॅशनल ड्रग्ज बनवण्याचा प्रयत्न करणार होता, अशी देखील माहिती पोलिसांना आतापर्यंत त्याच्या चौकशी मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा
उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या ३७८ जागा
भारत-पाकिस्तान सीमेजवळ शिवछत्रपतींचा पुतळा
धनंजय मुंडेंनी सांगितले उद्धव ठाकरेंचे पाप!
नाशिकमध्ये ड्रग्ज बनवणारा ललित पाटील हा महाराष्ट्रातून इतर सप्लाय करत होता. हे ड्रग्ज महाराष्ट्रातून गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तर काही भागांमध्ये जात होते. ललित पाटील याचे कनेक्शन फक्त इथवर न थांबता दक्षिणेत तामिळनाडू, कर्नाटक,आंध्रप्रदेश तसेच छत्तीसगड राज्यातदेखील पसरले होते. ललित पाटील याला नाशिकमधील फॅक्टरी प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. मात्र ललित पाटीलचे  हे ड्रग्जचे साम्राज्य फक्त आंतरराज्यापुरतेच मर्यादित नव्हते  तर तो देशाबाहेरदेखील पसरवण्याच्या तयारीत होता, अशीही माहिती  तपासात समोर आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी