32 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeराजकीयभाजपला धक्का : 'या' मंत्र्याची आमदारकी गेली

भाजपला धक्का : ‘या’ मंत्र्याची आमदारकी गेली

लय भारी टीम

अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयानं गैरवर्तणूक आणि फेरफार केल्याच्या आरोपावरून ढोलका विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द ठरवली. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळात असलेले कायदामंत्री भूपेंदरसिंह चुडासामा यांची आमदारकी गेली आहे. काँग्रेसचे उमेदवार आश्विन राठोड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयानं हा निकाल दिला. गुजरात सरकारला मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानं धक्का बसला.

या विषयी अधिक माहिती अशी की, गुजरात विधानसभेसाठी २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत ढोलका मतदारसंघातून भूपेंद्रसिंह चुडासामा हे भाजपाचे उमेदवार होते. तर काँग्रेसकडून आश्विन राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निकालात चुडासामा यांनी आश्विन राठोड यांचा ३२७ मतांनी पराभव करत विजय संपादन केला होता. निकालानंतर काँग्रेसचे उमेदवार राठोड यांनी मतमोजणीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. ४२९ मतं मोजण्यात आली नाही, असं त्यांनी याचिकेत म्हटलं होतं. याप्रकरणी आश्विन राठोड यांनी थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

काय होता याचिकेत आरोप…

“भाजपाचे आमदार भूपेंद्र सिंह चुडासामा यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध ठिकाणी विशेषतः मतमोजणी वेळी भ्रष्ट वर्तन केलं. त्याचबरोबर नियमांचं उल्लंघन केलं,” असा आरोप राठोड यांनी याचिकेत केला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती परेश उपाध्याय यांच्या खंठपीठासमोर सुनावणी सुरू होती.

मंगळवारी (१२ मे) न्यायालयानं प्रकरणाचा निकाल दिला. राठोड यांनी केलेले आरोपांचा ठपका ठेवत न्यायालयानं ढोलका मतदारसंघातील निवडणूक रद्द केली. उच्च न्यायालयाच्या निकालाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. चुडासामा यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
चुडासामा यांच्याकडे होती दोन खाती…

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या सरकारमध्ये भूपेंद्रसिंह चुडासामा हे दोन खात्यांचे मंत्री आहेत. कायदा मंत्र्यांबरोबर शिक्षण मंत्र्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी