35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयकेंद्र सरकार जेवढं डोकं विरोधी पक्षांच्या राज्यांविरोधात वापरते तेवढं लसीसाठी वापरले असते...

केंद्र सरकार जेवढं डोकं विरोधी पक्षांच्या राज्यांविरोधात वापरते तेवढं लसीसाठी वापरले असते तरं…

टीम लय भारी

नवी दिल्ली :- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राजधानी दिल्लीतही कोरोना परिस्थिती गंभीर आहे. याशिवाय, अरविंद केजरीवाल यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीमध्ये हेराफेरी केल्याचा आरोपही आदेश गुप्ता यांनी केला आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी केंद्र सरकारला सणसणीत टोला लगावला आहे (Deputy Chief Minister Manish Sisodia has slammed the Center).

कोरोना परिस्थितीवरून दिल्ली भाजपाचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी पुन्हा एकदा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांचा हवाला देत-देत केजरीवाल सरकारने दिल्लीला कोरोनाचा मृत्यूदर प्रती 10 लाखांच्या यादीत आघाडीवर आणून ठेवला आहे.

रोहित पवारांनी केले न्यायालयाच्या मताचे स्वागत परिस्थिती समजून घेण्याचे केंद्राला केले आवाहन!

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून फडणवीसांवर छगन भुजबळांची खोचक टीका

Monsoon likely to be normal across the country this year, says weather department

मनिष सिसोदीया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षात असणाऱ्या राज्यांविरोधात लढण्यासाठी शक्ती वापरण्याऐवजी केंद्राने तिचा वापर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात करावा असे सिसोदीया यांनी म्हटले आहे. “केंद्र सरकार (Central Government) जेवढं डोकं विरोधी पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्य सरकारांशी लढण्यासाठी वापरत आहे त्याच्या एक टक्का जरी कोरोनाविरुद्धच्या लढाईत किंवा लसीकरणाची व्यवस्था बसवण्यासाठी वापरले असते तर आज देशात हाहाकार उडाला नसता. एवढ्या जणांचा मृत्यू झाला नसता. पण ते म्हणतात ना ज्याच्या मानसिकतेमध्ये जे असते तेच तो करतो तसा प्रकार आहे.” अशा शब्दांत सिसोदीया यांनी निशाणा साधला आहे.

केजरीवाल फेरफार करण्यामध्ये पारंगत आहेत, त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही अरविंद केजरीवाल यांनी कोरोनामुळे मरण पावलेल्यांची खरी आकडेवारी लपवल्याचा आरोप आदेश गुप्ता यांनी केला आहे. याचबरोबर, ठरवा आणि निवडा या आधारावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मरण पावलेल्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला. परंतु दुसरीकडे शेकडो असे कोरोना योद्धे आहेत जे मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळण्याची वाट पाहत आहेत. तरी मुख्यमंत्र्यांनी अशा लोकांची साधी दखलही घेतली नाही, असा आरोप आदेश गुप्ता यांनी केला आहे. एवढेच नाही तर दिल्लीमधील परिस्थिती चिंताजनक असताना अरविंद केजरीवाल यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य व्यवस्थेच्या कमतरतेमुळे दिल्लीत रुग्णांचा मृत्यू होत असतानाच दुसरीकडे केजरीवाल या परिस्थितीची जबाबदारी इतर कोणावर तरी ढकलण्याचा प्रयत्न करत होते. अन्य राज्यांच्या तुलनेत प्रती 10 लाख व्यक्तींच्या हिशोबाने दिल्लीमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेत, असे आदेश गुप्ता म्हणाले.

केजरीवाल सरकार कोरोना मृतांची आकडेवारी लपवतेय, भाजपाचा आरोप

दिल्लीत केजरीवाल सरकारने पहिल्या लाटेच्यावेळी सुद्धा आकडे लपवल्याचा खेळ खेळला होता, असा आरोपही आदेश गुप्ता यांनी केला. तसेच, दुसऱ्या लाटेच्या वेळीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानवतेलाही लाजवेल अशी वागणूक दिल्लीकरांना देत मृतांचा खरा आकडा लपवल्याचा दावा आदेश गुप्ता यांनी केला आहे. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार एका दिवसात दिल्लीत 450 हून अधिक जणांचा मृत्यू झालेला नाही. तर दुसरीकडे दिल्ली महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार एका दिवसात वेगवेगळ्या स्मशानभूमींवर एका दिवसात 700 हून अधिक जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत, असे आदेश गुप्ता यांनी सांगितले.

आकडेवारी दर्शविते की 1 एप्रिल ते 17 मे दरम्यान दिल्लीतील तीन महानगरपालिकांमधील स्मशानभूमींमध्ये 16593 मृतदेहांवर अंत्यसंस्कार कोरोना विधीने करण्यात आले. केजरीवाल सरकारने या काळात केवळ 11061 मृत्यूची आकडेवारी जाहीर केली. केजरीवाल सरकारला मृतांची संख्या बदलून मृतांच्या कुटूंबाला नुकसान भरपाई देणे टाळायचे आहे का? केजरीवाल सरकारने मृतांची संख्या लपवून खोटे आरोप करण्याच्या लालसेने संवेदनशीलतेच्या कळसांवर विजय मिळविला ही बाब लाजिरवाणी आहे. या घृणास्पद कृत्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांची माफी मागावी, असेही आदेश गुप्ता म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी