32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयबॉलिवूड तारकांना भेटणाऱ्या पंतप्रधान मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अपमान!

बॉलिवूड तारकांना भेटणाऱ्या पंतप्रधान मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अपमान!

टीम लय भारी

मुंबई :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे बॉलिवूड तारकांना भेट देतात. पण अनेकदा विनंती करून ही संभाजीराजे छत्रपती यांना मोदींनी (Modi) भेट दिली नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे असे वक्तव्य कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केली आहे. निवडणुकीच्या वेळीच भाजप आणि नरेंद्र मोदीं (Narendra Modi) यांना छत्रपतींची आठवण येते असा संतप्त सवाल ही सचिन सावंत यांनी विचारला. बॉलिवूड तारकांना भेटणाऱ्या पंतप्रधान मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे(It is an insult to Maharashtra that Prime Minister Modi, who met Bollywood stars, did not give time to Sambhaji Raje).

सचिन सावंत (Sachin Sawant) आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षण प्रश्नावर खासदार छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चारवेळा भेटण्याची वेळ मागितली. परंतु आजपर्यंत मोदींनी (Modi) त्यांना वेळच दिली नाही. चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगना राणावत आणि इतर बॉलिवूड अभिनेत्यांना भेट देतात. या सर्व तारकांचे कोणते गहन प्रश्न होते त्यांना मोदींनी (Modi) वेळ दिला आणि मराठा आरक्षणाकरिता भेट मागणाऱ्या छत्रपती संभाजीराजेंना (Sambhaji Raje) भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही. संभाजीराजेंना भेट न देणे हा महाराष्ट्राचा अवमान असल्याचे त्यांनी म्हटले (He said that not visiting Sambhaji Raje was an insult to Maharashtra).

राजकारणातील विश्वासू आणि निष्ठावान सहकाऱ्याच्या निधनाने पवार हळहळले

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका

In UP’s Prayagraj, covers removed from shallow graves along the Ganga, say reports

मोदींनी कोणाला भेटावे हा त्यांचा प्रश्न असल्याने आमचा आक्षेप नाही पण मराठा समाजाच्या समस्या घेऊन जाणाऱ्या आपल्याच पक्षाच्या नेत्यांना व ते ही छत्रपतींच्या वंशजाला भेट न देणे हे महाराष्ट्राला कदापि आवडणार नाही.

‘मोदींना मराठा आरक्षणापेक्षा बॉलिवूडची जास्त माहिती’

महाराष्ट्रातील बॉलिवूडबद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही, हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८  मोर्चे काढून इतिहास रचणाऱ्या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे तसेच मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्यांचा घोर अपमान करणारे आहे. चंद्रकांत पाटील हे मनकवडे आहेत असे दिसते. मनकवड्या चंद्रकांत पाटील यांनी मोदींना मराठा आरक्षण राज्याचा विषय वाटल्याने संभाजीराजे (Sambhaji Raje) यांना मोदींनी भेट दिली आहे असे म्हटले होते.

त्यांच्या वक्तव्यातून त्यांनी तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. मोदींची (Modi) विषयांची समज फार कमी आहे. मोदींना मराठा आरक्षण हा विषय समजलाच नाही आणि छत्रपती संभाजीराजे (Sambhaji Raje) यांच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ मतांकरिता वापरण्या इतपतच मोदींच्या (Modi) लेखी किंमत आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या अखत्यारित असतानाही भाजपाकडून त्यावर राजकारण केले जात आहे. राज्य सरकारवर सर्व ढकलून राज्यातील भाजपा नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची विचारधारा ही आरक्षणविरोधी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी जर भाजपाची प्रामाणिक इच्छा असती तर पाच वर्ष महाराष्ट्रात तसेच केंद्रातही सत्ता असताना ‘फुलप्रुफ’ आरक्षण देता आले असते पण सर्वोच्च न्यायालयाने फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण किती ‘फुलप्रुफ’ होते हे दाखवून दिले आहे, असे ही सचिन सावंत (Sachin Sawant) म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी