29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रकोविड सेंटरमध्ये रुग्णासोबत रोहित पवारांचा डान्स, दरेकर म्हणतात पवारांचा नातू म्हणून दुसरा...

कोविड सेंटरमध्ये रुग्णासोबत रोहित पवारांचा डान्स, दरेकर म्हणतात पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?

टीम लय भारी

मुंबई :-  राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोरोना रुग्णांसोबत काल झिंगाट गाण्यावर डान्स केला. या डान्सचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु विरोधकांनी टिका केली आहे. “पीपीई किट न घालता रोहित पवारांनी (Rohit Pawar) डान्स केला. शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित पवारांना दुसरा न्याय का?” असा सवाल विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे(Sharad Pawar has grandsons, so why give another justice to Rohit Pawar? ” This question has been asked by the Leader of Opposition in the Legislative Council Pravin Darekar). 

“रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका कोव्हिड सेंटरवर (Covid Center) जाऊन कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग केला, तो निषेधार्ह आहे. कोणते ही पीपीई किट न घालता ते गेले, त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरु शकतात. सर्व सामन्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार (Rohit Pawar) हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना दुसरा न्याय का?, असा प्रश्न निर्माण होतो. कुणी ही लोक प्रतिनिधी असो, त्यांनी गांभीर्याने या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे” असे प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले.

कोविड सेंटरमध्ये रुग्णासोबत रोहित पवारांचा ‘झिंगाट’ डान्स ! त्यांच्या डान्सने वातावरण झाले हलकंफुलकं

राजकारणातील विश्वासू आणि निष्ठावान सहकाऱ्याच्या निधनाने पवार हळहळले

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हिड केअर सेंटरला (Covid Center) कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला.

रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार (Rohit Pawar) रुग्णांच्या चेहऱ्यावरील ताण दूर करण्यासाठी त्यांच्यासोबत झिंगाट गाण्यावर थिरकताना पाहायला मिळाले. यावेळी कोरोना रुग्णही भारावल्याचे चित्र दिसले.

Facebook says it ‘aims to comply’ with new social media rules as Centre’s deadline set to end

एनसीपी विधायक रोहित पवार ने कोरोना मरीजों के साथ किया डांस

रोहित पवार (Rohit Pawar) हे सातत्याने आपल्या मतदारसंघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना पाहायला मिळतात. वेळोवेळी विविध रुग्णालये, तसेच कोविड सेंटरला (Covid Center) भेटी देऊन ते रुग्णांशी चर्चा करताना पाहायला मिळतात. तसेच रुग्णांवर होणाऱ्या उपचारांची माहितीही ते घेत असतात. रविवारी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बारामतीमधील कोविड सेंटरला (Covid Center) भेट देत स्थितीचा आढावा घेतला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी