29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeराजकीयकोविड सेंटरमध्ये रुग्णासोबत ‘झिंगाट’ डान्सवरून दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचे चोख प्रत्युत्तर

कोविड सेंटरमध्ये रुग्णासोबत ‘झिंगाट’ डान्सवरून दरेकरांच्या टीकेला रोहित पवारांचे चोख प्रत्युत्तर

टीम लय भारी

मुंबई :-  कोविड सेंटरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कोरोना रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर डान्स केला. त्यांच्या त्या डान्साचा व्हिडिओ सध्या सर्वत्रच व्हायरल झाला आहे. पण रोहित पवारांच्या (Rohit Pawar) या डान्सवरुन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी जोरदार टीका केली आहे. यावर आता रोहित पवार यांनी ही चोख प्रत्युत्तर दिले आहे (Rohit Pawar has given this correct reply).

“सन्माननीय प्रवीण दरेकर (Praveen Darekar) साहेब कोविड सेंटरमधली (Covid Center) माणसे माझ्या कुटुंबातली असून त्यांच्यासाठी किती ही केले तरी ते कमी आहे. त्यामुळे शक्य ते सगळे करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्यांची काळजी घेतो. त्यांना काल एकच दिवस भेटलो असे नाही तर नेहमीच भेटतो. माझ्या मतदारसंघातले अधिकारी आणि नागरिक ही या रुग्णांची जमेल तशी सेवा करतात. कोविडमुळे खचलेल्या रुग्णांना माझ्या भेटीमुळे धीर येत असेल, त्यांच्या आनंदात दोन मिनिटे सहभागी झाल्याने तो द्विगुणित होत असेल तर त्यात गैर काय? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हाच माझ्यासाठी आनंद आहे,” असे रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

कोविड सेंटरमध्ये रुग्णासोबत रोहित पवारांचा ‘झिंगाट’ डान्स ! त्यांच्या डान्सने वातावरण झाले हलकंफुलकं

कोविड सेंटरमध्ये रुग्णासोबत रोहित पवारांचा डान्स, दरेकर म्हणतात पवारांचा नातू म्हणून दुसरा न्याय का?

After India, which countries could see a big rise in Covid-19 cases?

त्याचबरोबर  “५ वी नापास झालेल्या गुजरातमधल्या एका आमदारासारखे मी रुग्णाला इंजेक्शन दिले नाही. तसेच आपल्याही पक्षाचे अनेक नेते पीपीई किटशिवाय रुग्णांना भेटले, तेंव्हा त्यांच्या निदर्शनास आपण ही गोष्ट आणून दिल्याचे ही काही दिसले नाही! असे का?”, असा सवालही रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रवीण दरेकरांना (Praveen Darekar) विचारला आहे.

प्रवीण दरेकर काय म्हणाले?

“रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एका कोव्हिड सेंटरवर (Covid Center) जाऊन कोव्हिड प्रोटोकॉलचा भंग केला, तो निषेधार्ह आहे. कोणते ही पीपीई किट न घालता ते गेले, त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरु शकतात. सर्व सामन्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार (Rohit Pawar) हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना दुसरा न्याय का?, असा प्रश्न निर्माण होतो. कुणीही लोक प्रतिनिधी असो, त्यांनी गांभीर्याने या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे” असे प्रवीण दरेकर (Praveen Darekar) म्हणाले.

कोरोना रुग्णांसोबत रोहित पवारांचा ‘झिंगाट’ डान्स

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोव्हिड केअर सेंटरला कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रोहित पवार (Rohit Pawar) रुग्णांच्या चेहऱ्यावरील ताण दूर करण्यासाठी त्यांच्यासोबत झिंगाट गाण्यावर थिरकताना पाहायला मिळाले. यावेळी कोरोना रुग्णही भारावल्याचे चित्र दिसले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी