31 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयशरद पवारांच्या मागोमाग जयंत पाटीलांनीही घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट

शरद पवारांच्या मागोमाग जयंत पाटीलांनीही घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट

टीम लय भारी

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यानंतर शुक्रवारी (ता.6) जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेतली आहे. मागील महिन्यात राज्यात आलेल्या महापूरादरम्यान कर्नाटक राज्याने केलेल्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले (Jayant Patil meet today Karnataka Chief Minister Basavaraj Bommai).

अलमट्टी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे कोल्हापूर, सांगली भागांना पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते याबाबत उपाययोजना कराव्यात याबाबत भेट घेतली होती. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात यासाठी भेट घेतली होती. यावर त्यांनी तातडीने निर्णय घेतला होता. त्यामुळे दोन्ही राज्यातील मोठी जीवित व वित्तहानी टळली. यामुळे आज जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीची माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शरद पवारांना फोन; त्यानंतर झाली भेट

आदित्य ठाकरेंचा पुढाकार, मुंबईत आणखी ६ पूल उभारणार

मागील महिन्यात आलेल्या महापूरादरम्यान कर्नाटक राज्याने केलेल्या सहकार्यामुळे दोन्ही राज्यातील धरणांच्या सुयोग्य नियोजनामुळे बऱ्याच मोठ्याप्रमाणावर होणारी मोठी जीवित व वित्तहानी टळली आहे. येणाऱ्या काळातही दोन्ही राज्ये योग्य समन्वय साधतील असा विश्वास यावेळी जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे (Jayant Patil said The two states will continue to coordinate properly in the years to come).

Jayant Patil Karnataka Chief Minister Basavaraj Bommai
जयंत पाटील आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बैठक

पुरामुळे कोकणातला मच्छिमार आर्थिक संकटात : सदाभाऊ खोत

Sharad Pawar invites Amit Shah to visit sugar industry institute in Pune

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व कर्नाटकातील जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. येत्या 13 ते 20 ऑगस्टदरम्यान हवामान खात्याने आयएमडी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या विषयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे (The meteorological department has forecast IMD torrential rains from August 13 to 20).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी