31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeराजकीयकेजरीवालांचा पंजाब जिंकण्यासाठी नवा फंडा; रिक्षावाल्याच्या घरी जेवण अन् ऑटो राईड

केजरीवालांचा पंजाब जिंकण्यासाठी नवा फंडा; रिक्षावाल्याच्या घरी जेवण अन् ऑटो राईड

टीम लय भारी

नवी दिल्लीः पंजाबमध्ये लवकरच निवडणुका होणार असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमध्ये अरविंद केजरीवालांनी आज मोगा येथे एका सभेला संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते(Kejriwal’s new fund to win Punjab)

आम आदमी पक्षाने सरकार स्थापन केल्यास 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांना 1000 रुपये देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच केजरीवाल यांनी आज रात्री एका ऑटो चालकाच्या घरी जेवण केले. खुद्द केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

भाजपची भूमिका आगीत तेल टाकून आग वाढवण्याची; राज्यातील हिंसेवरून पवारांचा हल्लाबोल

भाजपला गुजरातप्रमाणे महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची आहे का?: नाना पटोले

अन्य एका नेत्यासोबत ऑटो राईडचा आनंदही घेतला

एका ऑटोचालकाने मला त्याच्या घरी जेवायला बोलावले, तेव्हा मी खूप प्रभावित झालो, असे ते म्हणाले. आम्ही तिथे जेवायला नक्की जाऊ म्हणत रात्रीच्या जेवणानंतर केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाचे खासदार भगवंत मान आणि अन्य एका नेत्यासोबत ऑटो राईडचा आनंदही घेतला.

केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले की, ‘दिलीप तिवारी यांनी आज आम्हाला त्यांच्या घरी जेवायला बोलावले. त्याच्या कुटुंबाने खूप प्रेम दिले. अतिशय चवदार अन्न होते. मी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आता दिल्लीत माझ्या घरी जेवायला बोलावलेय.

भाजपला धक्का,जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचा 20 जागांवर विजय

Kejriwal sounds poll bugle in Punjab: Promises Rs 1,000 monthly to every woman if AAP wins

प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये दिले जाणार

अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या पंजाब दौऱ्यावर आहेत. पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा एक हजार रुपये दिले जातील, असे ते म्हणाले. 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या प्रत्येक महिलेला हा लाभ मिळेल आणि ही रक्कम वृद्ध मातांना वृद्धापकाळ पेन्शनपासून वेगळी असेल.

पंजाबमध्ये बनावट केजरीवालही फिरत असल्याचे ते म्हणाले. मी जे काही वचन देऊन जातो, दोन दिवसांनी मग ते बोलतात, पण काहीच करत नाहीत. यापूर्वी त्यांनी 24 तास 300 युनिट मोफत वीज आणि पंजाबमधील प्रत्येक व्यक्तीला मोफत उपचार देण्याची दोन आश्वासनं दिलीत.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “बनावट केजरीवालांनी” पंजाबमध्ये 15,000 मोहल्ला दवाखाने उभारण्याचे आश्वासन दिल्यानंतर तेच वचन बनावट केजरीवालांनी दिल्याचं सांगत विरोधकांवर हल्लाबोल केलाय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी