31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
HomeराजकीयChild Lifters Sadhus : सांगलीमध्ये लोकांनी केली चार साधूंची मारहाण; सहा जणांना...

Child Lifters Sadhus : सांगलीमध्ये लोकांनी केली चार साधूंची मारहाण; सहा जणांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चार साध‍ू मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत. ते कर्नाटकातील बिजापूर भागातून सोलापूर जिल्हयातील पंढरपूर येथील देवस्थानी येण्यास निघाले होते. परंतु वाटेमध्ये त्यांनी एका मुलाला तेथे जाणाऱ्या रस्त्याबद्यल विचारणा केली. तेव्हा तेथील स्थानिक लोकांना हे साधू लहान मुले पळविणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय आला आणि त्या कारणास्तव त्यांनी साधूंची मारहाण केली.

महाराष्ट्रातील सांगली जिल्हयामध्ये काही स्थानिक लोकांनी मंगळवारी चार साधूंना गंभीर मारहाण (Mob-lynching) केल्याची घटना निदर्शनास आली आहे. तेथील स्थानिकांना ते चार साधू (Sadhus) लहान मुले पळविणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय होता. सदर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडीयावर खूप वायरल होत आहे. ही घटना सांगली जिल्हयातील लवाना या गावची आहे. व्हिडीओमध्ये त्या गावातील संतप्त नागरिक चारही साधूंना लाकडी दांडयांनी मारताना दिसत आहेत. त्यानंतरच्या क्लिपमध्ये तेथील लोक एक साधू गाडीमध्ये बसत असताना त्याचा पाय खेचून गाडीबाहेर काढताना दिसत आहेत. नंतर त्याला त्याचे आधार कार्ड दाखवण्याची मागणी करत आहेत आणि त्याला पटटयाने मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. हया घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी (Police) सहा लोकांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चार साध‍ू मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत. ते कर्नाटकातील बिजापूर भागातून सोलापूर जिल्हयातील पंढरपूर येथील देवस्थानी येण्यास निघाले होते. परंतु वाटेमध्ये त्यांनी एका मुलाला तेथे जाणाऱ्या रस्त्याबद्यल विचारणा केली. तेव्हा तेथील स्थानिक लोकांना हे साधू लहान मुले पळविणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय आला आणि त्या कारणास्तव त्यांनी साधूंची मारहाण केली.

हया पीडित साधूंनी लवाना मध्ये मंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर ते आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघाले. हे चार साधू उत्तर प्रदेशातील ‘अखाडा’ परिषदेचे सदस्य आहेत.

हे सुद्धा वाचा –

T-20 : भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचे तीन दिग्गज खेळाडू संघाबाहेर

Indian independence : स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी नंतरही स्वातंत्र्य सैनिकांना हक्कांसाठी लढावे लागतेय

Goa Congress : गोव्यातील काँग्रेसच्या आठ आमदारांनी शपथ मोडली

सदर घटना घडल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचल‍े आणि जखमी साधूंना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. त्या साधूंना आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघायचे होते त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर झालेल्या मारहाणीची तक्रार स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये दाखल केली नाही. त्यामुळे झालेल्या घटनेची पोलिसांनी स्वत: दखल घेऊन मारेकऱ्यांविरूद्ध दंगल आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे आणि एका व्यक्त्तिच्या शोध सुरू आहे.

महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार राम कदम यांनी व्हिडीओद्वारे संदेश प्रसारित करून झालेल्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी पुढे स्पष्ट केले की साधूंना दिलेली अशी वागणूक महाराष्ट्र शासनाकडून खपवून घेतली जाणार नाही. हया घटनेमध्ये दोषी असलेल्या आरोपींवर कडक कारवाई केली जाईल.

2020 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्हयातील पालघर भागात सुद्धा काही साधूंवर मारहाणीचा प्रकार उघडकीस आला होता. तेव्हाच्या सरकारने आरोपीं विरोधात कोणतीही कठोर कारवाई केली नव्हती परंतु सध्या सत्तेत असलेले सरकार साधूंविरोधात झालेल्या कोणत्याही गुन्हयाची पाठराखण न करता आरोपींवर कडक कारवाई करेल असे शेवटी कदम यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे (Shivsena) प्रवक्ते आनंद दुबे यांनी झालेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने स्पष्ट करावे की, आता किती भाजप नेते सांगली मध्ये जाऊन झालेल्या घटनेची दखल घेतील. सध्या राज्यात असलेले सरकार म्हणते की ते हिंदू धर्माचे समर्थक आहेत पण तेच सत्तेत असताना साधूंवर अशाप्रकारचा अत्याचार होत आहे. ते जेव्हा सत्तेत नव्हते तेव्हा हे बोलणे खूप सोपे आहे की सत्तेत असलेल्या लोकांना हिंदूबद्दल कोणतीही आस्था नाही. परंतु ते स्वत: आता सत्तेत आहे तर त्यांनी या घटनेची दखल घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी.

अश्विन शेश्वरे
अश्विन शेश्वरेhttp://laybhari.in
He writes about National and Maharashtra Politics, Education, Health, Civic, Legal, Crime and Sports beat for LayBhari News.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी