30 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeमहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकारचे 'हे' मंत्री पालकमंत्रिपदापासून वंचित

महाविकास आघाडी सरकारचे ‘हे’ मंत्री पालकमंत्रिपदापासून वंचित

लयभारी न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ आणि खातेवाटप विस्तारानंतर बुधवारी रात्री पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. परंतु या यादीत सात मंत्र्यांना एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळालेले नाही. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या यादीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांसह रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे, तर राज्यमंत्र्यांपैकी प्राजक्त तनपुरे, दत्तात्रय भरणे, राजेंद्र पाटील यड्रावकर, डॉ. विश्वजीत कदम, संजय बनसोडे यांनाही एका जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळालेले नाही.

हे मंत्री पालकमंत्रिपदापासून वंचित….

जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री
संदीपान भुमरे – रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री
प्राजक्त तनपुरे – राज्यमंत्री
दत्तात्रय भरणे – राज्यमंत्री
राजेंद्र पाटील यड्रावकर – राज्यमंत्री
विश्वजीत कदम – राज्यमंत्री
संजय बनसोडे – राज्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यासह गडचिरोलीचेही पालकमंत्री पद मिळालेले आहे. तर कोकणातील दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे शिवसेनेला मिळालं आहे. यात सिंधुदुर्गाचे पालकमंत्रिपद उदय रविंद्र सामंत यांच्याकडे तर रत्नागिरीचे पालकमंत्रिपद अनिल दत्तात्रय परब यांना देण्यात आले आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री पद हे काँग्रेसच्या वाट्याला आलं आहे. यामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांना गोंदियाचे पालकमंत्री पद मिळालेले आहे. तर इतर मागासवर्ग सामाजिक मंत्री विजय वडेट्टीवार यांना चंद्रपूर, राज्यमंत्री सतेज पाटील यांना भंडारा, उर्जा मंत्री नितीन राऊत यांना नागपूर आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांना वर्ध्याचे पालकमंत्री पद मिळालेले आहे

शिवसेना (13)

1. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
2. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
3. रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब
4. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
5. पालघर- दादाजी दगडू भुसे
6. धुळे- अब्दुल नबी सत्तार
7. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
8. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
9. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
10. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
11. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे
12. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
13. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

राष्ट्रवादी (12)

1. पुणे- अजित अनंतराव पवार
2. रायगड – आदिती सुनिल तटकरे
3. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
4. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
5. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
6. सांगली- जयंत राजाराम पाटील
7. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
8. जालना- राजेश अंकुशराव टोपे
9. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
10. बीड- धनंजय पंडितराव मुंडे
11. बुलडाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
12. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

काँग्रेस (11)

1. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
2. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
3. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
4. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
5. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
6. लातूर- अमित विलासराव देशमुख
7. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
8. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
9. वर्धा – सुनील छत्रपाल केदार
10. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
11. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी