30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeलेखगणपतीतील गर्दीवर नियंत्रण गरजेचे !

गणपतीतील गर्दीवर नियंत्रण गरजेचे !

(शुभांगी पासेबंद)
कोणतेही सण मानवी मनोरंजन आणि त्यातून त्याला मनशांती  मिळावी यासाठी तयार करण्यात आलेले आहेत. पण गेल्या काही वर्षापासून प्रत्येक सण  हा इवेंट झाला असल्याने त्यातील पावित्र्य तर कधीच संपले आहे. उरला आहे तो देखावा. गणपतीच्या दिवसात दिवसेंदिवस रस्ते वाहतूक कोंडीने गुदमरत आहेत. असे असताना अनेक गणेशोत्सव मंडळाजवळची  नियंत्रणात आणणे पोलिसांना अवघड होऊन बसले आहे. 

गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी, लोक वेगळ्यावेगळ्या ठिकाणी जात असतात. गणेशोत्सवाचे दहा दिवस, नुसते देखावे बघणं नव्हे, तर त्या सोबत गणपतीचे दर्शन घेणं, हेसुद्धा महत्त्वाचं असतं. काही काही उंच गणपतींना तर वलय, सेलिब्रटी स्टेटसच दिले आहे. अगदी एक मुस्लिम नट, एका हिंदू उत्सवाच्या ठिकाणी जाऊन फोटो काढून गेल्यापासून या वर्षी तिथली गर्दी वाढली. गर्दीमुळे, यंत्रणेवरचा ताण अधिक वाढला आहे.

लालबागच्या राजाला गर्दीमुळे झुंबड उडाली, असं सगळ्या बातम्यांमध्ये, व्हिडिओसह फिरत होते. त्यात तो पुजारी, वेगळ्यावेगळ्या शिव्या देत,अरे ×××णारे मागे सरक, आगेपुढे सरक, अरे इकडे हो,अरे गाढवा असं वगैरे बोलत होता. देवाच्या दारी हा शिवी प्रसाद घ्यायला भक्त येतात का? गर्दी वाढली की पोलिस यंत्रणेवर स्वयंसेवकावर आणि नियंत्रण करणाऱ्यांवर पण ताण येतो. खारघर येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमातील अपमृत्यू आपल्याला धडा शिकवून गेले नाहीत का? उपाशीतापाशी देवदर्शनाला तासनतास रांगा लावून उभे असलेले लोक बेचैन होतात. यावेळी पोलीस बंदोबस्त चोख असतो हे खरंच आहे.

पण त्या वर्दीतल्या माणसालासुद्धा भक्ती, मन, बुद्धी, विचार अपेक्षा असतात. पण जनसामान्यांच्या आनंदा साठी हा वर्दीतला माणुस स्वतः च्या अपेक्षांना, इच्छांना, लांब ठेवून, मनातल्या मनात भक्ती प्रार्थना करुन, गर्दीतील माणसांना आनंदाने सण साजरा होऊ देण्याची काळजी घेतात. सर्व माणसे आहेत! पण लोंढे? गणपती बाप्पाने थोडीच कोणाला, इकडे या, असे बोलावले आहे ? लोक अंधभक्त आहेत. अंधश्रद्धा नुसती ओतप्रोत भरलेली आहे. माणसाच्या बुद्धीत कर्मकांड रुतलय.
गणेश बाप्पा हा बुद्धीचा देव आहे तो माणसांना सांगतो नीट निरीक्षण करून विचार करून निर्णय घ्या देवळांमध्ये गर्दी करू नका. आपण रेटारेटी करत जातो. या उलट बाप्पा सांगतात, माझ्या दर्शनाला येण्या पेक्षा, माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे.अपंग रुग्ण गलितगात्र सेवा, नरपूजा,सभ्य वर्तन, माणुसकी, नारायण, निसर्ग पूजा करावी.
स्वेद गंगेच्या तिरी नांदतो हरी! आणि सगळ्यात महत्त्वाचं माणसा सारखी कर्म करावी. देव देवळात कोंडू नका. देव सर्वत्र आहे. तुमच्या स्वतःच्या मनात डोकावून बघा.देव तिथेसुद्धा आहे.

देव म्हणतो, ‘ती सर्वव्यापी शक्ती म्हणजे मी (बाप्पा) तुम्हाला सर्वांना कुठेही  असलात तरी कृपादृष्टी देईन. माझे आशीर्वाद अखंड मिळत राहतील. गर्दी करु नका. ही भक्ती नाही, हा, गोंधळी ईव्हेंट होतोय.’
मंडळ  सुधारते, मंडळाचे अधिकारी खूप सुधारतात, ते चांगले विचार सांगतात.पण मंडळाचे बाप्पा चे विचार हे कोणी मंडळी ऐकत नाही. तुम्ही बाप्पाचा ऐकलं नाही, पर्यावरणाला हानी केली, तर दुष्काळ अतिवृष्टी भूकंप ही संकट येतात ना! तुम्ही बाप्पाचा ऐकल नाही तर बाप्पा तरी कशाला कुणाचे ऐकणार आहे ?

हे सुद्धा वाचा
लालबागचा राजा गणेशोत्सवात चेंगराचेंगरीमध्ये महिला-बालकांचे शोषण
जेजुरी गडाचा होणार जीर्णोद्धार; ३४९ कोटी ४५ लाखांचा खर्च
नागपुर शहरात पावसाचा कहर; पुरस्थितीमुळे लोकांचे हाल

मला वाटतं पुढच्या वर्षी या गणेशोत्सवासाठी, या खास गणपती बाप्पाला केवळ घरगुती गणपती मूर्ती मांडण्याची परवानगी द्यावी. 24×7 लाईव्ह दर्शन ठेवावे. गणेशोत्सव मंडळाने, लोक, गाव गोळा करून आणि जाहिरात करून इव्हेंट करुन लोकांना त्रास होईल असं वागू नये. पोलिसांवर पण ताण येतो आणि त्या स्टॅम्पेडमध्ये कोणाची हाडे मोडली असतील, पाय मुरगळून दुखावले, तर कुणाच्या डोळ्याला इजा झाली आहे. कोणाची बोटे दुखावली आहेत. एक सेकंदाच्या दर्शनासाठी, नजरेतून गणपती बाप्पांनी पोषण करावं, आपलं रक्षण करावं, म्हणून आपण जातो. मी देखील जाते.पण तिथे आपण असा अनुभव घ्यायचा? शिव्यांचा प्रसाद घ्यायला? त्यापेक्षा मानसपूजा करावी आणि घरून दर्शन घ्यावं.

याबाबत अजून पण एक पोस्ट आली होती.थकून मागून, गर्दीतून मारामारी करून घरी आलेल्या भक्ताला घरचा देव्हाऱ्यातला गणपती बाप्पा म्हणाला ”सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का?’ देव फक्त देवळातच नाही सर्वत्र आहे. देव तर सगळीकडेच आहे.मग त्या जीवाचा आटापिटा करून, गर्दी करून, साथीच्या रोगांच्या काळात अधिक साथी वाढवण्यात काही अर्थ आहे का? देवाला आपण सगळीकडे शोधतो पण आपल्या मनात आपल्याच अंतरात्म्यात डोकावून आपण देव बघत नाही.

एक सूचना करावीशी वाटते. पुढच्या वर्षी या गणेशोत्सवात भक्तांसाठी, कंपल्सरी रक्तदान करावयाची अट ठेवावी.रक्तदान करा, दर्शन घ्या. आत्तापासूनच जाहिरात करा की-
visitors, next year, Blood donation is compulsory.
खारघर येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमातील,गर्दी आणि अपमृत्यू आपल्याला धडा शिकवून गेले नाहीत का? (त्यादिवशी देखील मी खारघरला दुर्दैवाने अडकून पडले होते.) घरात अडकून घराचे छत बघणे, दवाखान्यात फेऱ्या घालणं, फार त्रासदायक असते. तो गणेश बाप्पा त्या संकटातून पण आपल्याला पार पाडतो, पण ते संकटच येऊ नये, याची काळजी घ्या. मित्र-मैत्रिणींनो, जनहो, घरातूनच बाप्पाचे दर्शन घ्या. गर्दी करायला जाऊ नका.
दर्शन मात्रे मन कामना पूर्ती !
ते दर्शन मानस दर्शन ठेवा की!
(लेखिका शिक्षण क्षेत्राशी संबंधित असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी