31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयमहाविकास आघाडीने दिली 'महाराष्ट्र बंदची' हाक

महाविकास आघाडीने दिली ‘महाराष्ट्र बंदची’ हाक

टीम लय भारी

मुंबई : लखीमपूर खेर येथे झालेल्या हिंसाचाराचा देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने ११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या संबंधात महाविकास आघाडीच्या तीन नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली होती (Mahavikas Aghadi calls for ‘Maharashtra Bandh’).

शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते आणि अप्लसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत महाराष्ट्राच्या जनतेला संजय राऊत यांनी एकत्र सहभागी होऊनया बंदला साथ देण्याची विनंती केली.

उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना झोडपले, शेलक्या शब्दांत दिल्या कानपिचक्या

नवाब मलिकांनी अखेर जाहीर केलं ‘त्या’ भाजपा पदाधिकाऱ्याचं नाव!

तसेच मलिक यांनी लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचाराचा विरोध करत भाजपवर टीका केली आहे. शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी केंद्र सरकारने तीन कायदे आणले. तसेच शेतकऱ्यांच्या  पाठीशी उभे राहण्यासाठी या बंदला पाठिंबा देण्याची विनंती मलिक यांनी केली.

नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे माझ्या कानात काहीतरी पुटपुटले; विनायक राऊतांनी पेढा दिला

Maharashtra’s MVA Govt Calls for Statewide Bandh To Protest Lakhimpur Kheri Incident

महाविकास आघाडीने दिली 'महाराष्ट्र बंदची' हाक

रविवारी राज्याच्या प्रत्येक भागात जाऊन महाविकास आघाडीचे नेते लोकांना हात जोडून बंदमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती करतील. आणि रविवारी रात्री १२ वाजल्यापासून या महाराष्ट्र बंदला सुरुवात होईल, असे मलिक म्हणले. हा बंद सुरु असताना अत्यावश्यक सुविधांना काहीही बाधा निर्माण होणार नाही. असे ही मलिक या वेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी