31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयमराठा आरक्षण: सर्वपक्षीयांच्या बैठकीत अजित पवारांच्या जागी शरद पवार

मराठा आरक्षण: सर्वपक्षीयांच्या बैठकीत अजित पवारांच्या जागी शरद पवार

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीमध्ये आंदोलन सुरू केल्याने राज्यातील मराठा समाज खवळून उठला आहे. मराठवड्यासह राज्यातील विविध ठिकाणी जाळपोळ सुरू झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे. मराठा आंदोलन शांत कसे करावे यासाठी आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूच्या खुर्चीवर चक्क शरद पवार बसल्याचे देशाने पहिले. अजित पवार हे या बैठकीला उपस्थित नसल्याने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्वोच्च नेत्याला अर्थात शरद पवार यांना मान देऊन अजित पवार यांची खोड मोडल्याची चर्चा दिवसभर अधिकारी वर्गात ऐकायला मिळाली.

राज्यातील महत्वाच्या विषयावर एखादी पत्रकार परिषद घ्यायची असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अनुक्रमे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस बसतात. मुख्यमंत्री शिंदे यांना एखादा प्रश्न अडचणीत टाकणारा असेल तर देवेंद्र फडणवीस त्यांचे वाकचातुर्य लावतात. प्रशासनातील दांडगा अनुभव असल्याने प्रशासकीय बाजू अजित पवार सांभाळून घेतात. हे तीन महिन्यात आपण पाहिलेले आहे.

अजित पवार यांना डेंग्यू झाल्याने ते सध्या घरीच आहेत. त्यामुळे ते आजच्या बैठकीला आले नाहीत. हीच संधी शोधत मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार यांच्या खुर्चीवर अर्थात आपल्या बाजूला शरद पवार यांना बसवून त्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला, शिवाय मंत्रिमंडळात वरचढ ठरत दादागिरी करणाऱ्या अजित पवार यांना चेकमेट देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

शरद पवार हे राज्यातील एक सर्वोच्च नेते आहेत. केंद्रात अटलबिहारी वायपेयी यांचे सरकार असताना शरद पवार यांना केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख बनवण्यात आले होते. देश पातळीवर सगळ्याच नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. 90 च्या दशकात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असताना पवार यांचे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी सौदाहर्याचे संबंध होते.

हे सुद्धा वाचा 

अजित पवारांच्या आमदारांची नौटंकी!
जरांगे पाटलांचं हिंसेला समर्थन आहे का? नितेश राणे यांचा थेट सवाल
सरकारच्या उलट्या बोंबा, माजी IAS प्रभाकर देशमुखांनी केली चिरफाड !

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असले तरी आणि ते केंद्रातील भाजपा सरकारचे विरोधक असले तरी मोदी आणि पवार यांची मैत्री लपून राहिलेली नाही. त्यामुळेच की काय मराठा आंदोलन चिघळत असताना शरद पवार हे इस्पीकच्या  एक्क्याचे पान माझ्याबरोबर असल्याने मराठा आंदोलन हाताळणे कठीण जाणार नाही, असा कदाचित मुख्यमंत्री शिंदे यांचा कयास असावा, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी