31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रसरकारच्या उलट्या बोंबा, निवृत्त IAS प्रभाकर देशमुखांनी केली चिरफाड !

सरकारच्या उलट्या बोंबा, निवृत्त IAS प्रभाकर देशमुखांनी केली चिरफाड !

सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यांत अनेक वर्षांपासून दुष्काळ पाठ सोडत नाही. या भागात पाऊस पडत नसल्याने येथील रहिवाशांचे हाल होत आहेत. त्याचप्रमाणे सरकार देखील दुष्काळाबाबत ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. या भागात शेती व्यवसाय असला तरी शेतीला पुरेसे पाणी नसल्याने वर्षानुवर्षे पीक पिकवणे अवघड होऊन बसले आहे. या भागातील काही शिक्षित तरूणांना नोकरीसाठी मुंबईसारख्या मायानगरीत जावे लागत आहे. यंदा माण-खटाव तालुक्यांत पाऊस झाला नाही, तरीही माण-खटाव तालुक्याला दुष्काळीभागाच्या यादीतून वगळून टाकले आहे. याउलट वाईसारख्या सुजलम सुफलम तालुक्याला दुष्काळीभागात सामावून घेतले आहे. यावर निवृत्त IAS प्रभाकर देशमुखांनी माण-खटाव तालुक्याला दुष्काळीभागाच्या यादीतून वगळल्याने संताप व्यक्त केला.

प्रभाकर देशमुख काय म्हणाले?

माण आणि खटाव तालुक्यात सातत्याने कमी पाऊस पडतो. सतत आम्हाला दुष्काळाला सामोरे जावे लागते. माणमध्ये यावर्षी ४२० मिमी तर खटावमध्ये ४०० मिमी पाऊस पडतो. यावर्षी ६१ % आणि ६८% पाऊस पडला असून सरकारने दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६, दुष्काळ जाहीर करण्यासाठी निश्चित केलेल्या निकशात आम्ही बसतो. अंतिम दुष्काळ जाहीर करत असताना काही प्रभाव निर्देशांक विचारात घेतले जात असून प्रामुख्याने प्रभाव निर्देशांक लक्षात घेतले जातात. यात पहिले म्हणजे वनस्पती निर्देशांक, आद्रता निर्देशांक, वनस्पतीस्थिती हे तीन निर्देशांक लक्षात घेतले जातात. त्याचप्रमाणे पाण्याची पातळी सातत्याने कमी होते.

हे ही वाचा

अजित पवारांच्या आमदारांची नौटंकी!

जरांगे पाटलांचं हिंसेला समर्थन आहे का? नितेश राणे यांचा थेट सवाल

साक्षात क्रिकेटचा देव मैदानात उभा ठाकतो तेव्हा…

लोकं हवालदील झालीत

माणमध्ये ३१ गावं आणि २२६ वाड्यांना ३९ टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. खटावमध्येही ३ गावं आणि ६ वाड्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र टॅंकरने केलेल्या पाणीपुरवठ्याने नागरिकांचे प्रश्न सुटत जरी असले तरीही जनावरांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे काय? लोकांच्या सातत्याने तक्रारी आहेत, पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. सर्वी अर्थव्यवस्था दुधाच्या व्यवसायावर अवलंबून आहे. यातुन मिळणाऱ्या पैशातून माण-खटावकर कसा बसा गुजारा करत आहेत. यासाठी सरकारकडे मी चारा डेपो आणि चारा छावणीची मागणी करतो, सरकार काही करत नाही. यामुळे लोकं हवालदील झाले आहेत.

सरकारच्या उलट्या बोंबा, निवृत्त IAS प्रभाकर देशमुखांनी केली चिरफाड !

येरळवडी, आंधळी या ठिकाणी पाणीसाठा शुन्य

आमच्या भागात मेंढपाळ करणारी आणि मजुरी करणारी लोकं आधिक आहेत. दुष्काळ जाहीर होत असताना प्रत्येक गावाचा युनिट म्हणुन विचार केला जातो. येरळवडी, आंधळी या ठिकाणी पाणीसाठा शुन्य आहे. यामुळे चारा टंचाई, पाणी टंचाई, रोजगाराची मागणी, स्थलांतर हे विचारात घ्यावे. माण-खटावमध्ये सुरू असलेल्या दुष्काळामुळे माण-खटावचे नाव गंभीर दुष्काळाच्या निकशात बसत असल्याचे प्रभाकर देशमुख म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी