30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमंत्रालयसुधीर मुनगंटीवारांची कौतुकास्पद क्रिएटीव्हिटी, कार्यालयाबाहेर मोबाईल क्रमांकासह अधिकाऱ्यांच्या नावाचा फलक

सुधीर मुनगंटीवारांची कौतुकास्पद क्रिएटीव्हिटी, कार्यालयाबाहेर मोबाईल क्रमांकासह अधिकाऱ्यांच्या नावाचा फलक

सरकारी कार्यालये कुठेही असो, आपल्याला ज्या कार्यालयात जायचे आहे, काम करून घ्यायचे आहे तिथे अनेकदा सर्वसामान्य माणूस गोंधळतो आणि त्याचे सरकारी कार्यालयातील हेलपाटे वाढत जातात. पण एखाद्या खात्याच्या कार्यालयात कोणता अधिकारी कुठे बसतो?  कधी भेटतो? याची माहिती सर्वसामान्य व्यक्तीला मिळाली तर दुधात साखरच असे त्याला वाटते. महाराष्ट्रात अनेक सरकारी कार्यालये आहेत, त्यात सर्वसामान्य माणसाला चांगली वागणूक काही मिळत नाही; त्यामुळे तो व्यवस्थेविरोधात चिडतो. पण चिडूनही सगळ्याच समस्या काही सुटत नाहीत. जर एखाद्याला योग्य प्रकारची माहिती सरकारी कार्यालयात मिळाली तर त्याचा वेळ आणि श्रमही वाचतात.

राज्याचे प्रशासकीय सर्वोच्च भवन म्हणजे मंत्रालय. या वास्तुला दररोज 3 हजार नागरिक भेट देतात. मंत्रिमंडळ बैठक असेल तर हा आकडा पाच हजारावर जातो. अशी ही मंत्रालयाची वास्तू पहिल्या भेटीत समजणे अवघड. या वास्तूत राज्यातल्या सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिवाय विविध खात्यांच्या मंत्र्यांची कार्यालये आहेत. मंत्रालयाच्या तीन इमारतीत ती विभागली गेली आहेत. त्यामुळे नव्याने आलेल्या व्यक्तीच्या हाताला भरकटल्याशिवाय काहीच लागत नाही. आपले काम कोणत्या मंत्र्याकडे आहे. त्यांचे कार्यालय कुठे आहे, हे माहीत नसल्याने अनेकजण या वास्तूत कार्यालये शोधत फिरत असल्याचा अनुभव आपल्याला येतो. पण जर त्या त्या मंत्र्यांचे कार्यालय कसे चालते? कुठला अधिकारी कुठे बसतो? ही माहिती झटपट मिळाली तर.. होय, ही सोय राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपलब्ध  केली आहे.

हे सुद्धा वाचा
सरकारच्या उलट्या बोंबा, निवृत्त IAS प्रभाकर देशमुखांनी केली चिरफाड !
 साक्षात क्रिकेटचा देव मैदानात उभा ठाकतो तेव्हा…
मराठा आरक्षण: सर्वपक्षीयांच्या बैठकीत अजित पवारांच्या जागी शरद पवार

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील कार्यालयाबाहेर एक निळा फलक (बोर्ड) सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या बोर्डवर मंत्र्यांचे खासगी सचिव आणि सहा विशेष कार्य अधिकारी यांच्या फोटोसह मोबाईल नंबर दिले आहेत. सुधीर मुनगंटीवार हे राज्यातील एक जबाबदार आणि महत्वाचे मंत्री आहेत.

एकीकडे वन खाते, दुसरीकडे सांस्कृतिक कार्ये आणि तिसरीकडे मत्स्यव्यवसाय अशा खात्यांचे मंत्री असलेले मुनगंटीवार हे धडाडीच्या कामामुळे ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघ नखाने अफजल खान याचा कोथळा काढला ती वाघनखे आणण्यासाठी ते इंग्लंडला जावून आले आहेत. संघ आणि फडणवीस यांच्या खास मर्जीतल्या मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. नेहमी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी आग्रही असतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी