25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमंत्रालयअजित पवारांच्या आमदारांची नौटंकी!

अजित पवारांच्या आमदारांची नौटंकी!

राज्यभर मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation Protest) आंदोलने होत असताना आता मराठा आंदोलनाचे लोण मंत्रालयातही पोहोचले आहे. मंत्रालय परिसरात काही आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. मराठा आरक्षणासाठी या आमदारांनी घोषणाबाजी करून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत आपला आक्रोश व्यक्त केला. यावेळी, त्यांनी मंत्रालयाला कुलूप लावत कोणत्याही मंत्र्याला मंत्रालयात जाऊ न देण्याची भूमिका घेतली होती. यावरून, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जोरदार टीका केली आहे. “मराठा मतांच्या लाचारीपोटी मंत्रालयाच्या दरवाजात बसून चाललेली नौटंकी बंद करा,” अश्या शब्दांत विकास लवांडे यांनी आमदारांवर टिका केली आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना पक्षाच्या काही आमदारांनी मंत्रालयाला कुलूप लावत आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांमध्ये अमोल मिटकरी, चेतन तुपे, राहुल पाटील, बाळासाहेब पाटील, बाबाजानी दुर्रानी, बाबासाहेब आजबे, कैलास पाटील, विक्रम काळे, नीलेश लंके, राजू नवघरे, दिलीप बनकर, यशवंत माने आणि मोहन उबर्डे या आमदारांचा समावेश होता.


आमदारांनी केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जोरदार टिका केली आहे. आपल्या “X” अकाऊंटवर (पूर्वीचे ट्विटर) ते म्हणाले, “मराठा आंदोलन सुरू असताना आज सर्वपक्षीय आमदारांची बैठक आहे. असे असताना, मंत्रालयाच्या दारवाजाला कुलूप लावून अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे काही आमदार आंदोलन करत आहेत. परंतु, या आमदारांना माझी विनंती आहे, आपण सारकारमाध्ये राहून जर सारकारविरोधात आंदोलन करत असाल तर याचा अर्थ तुम्ही हतबल झालेले आहात. तुमचा कुठलाही इलाज सरकारमध्ये चालत नाही.”

ते पुढे म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या बाबतीत आजपर्यंत तुम्ही कुठल्याही भूमिका घेतलेल्या नसताना आता सरकारमध्ये राहून मराठा मतांच्या लाचारीपोटी, मराठा समाजाला काय वाटेल म्हणून मंत्रालयाच्या दारवाजात बसून जे आंदोलन करत आहेत ति तुमची नौटंकी आहे. ही नौटंकी बंद करा. तुम्हाला मराठा आरक्षणाविषयी एवढाच कळवळा असेल तर सरकारमधून तत्काळ बाहेर पडा. मंत्रालयाच्या दरवाजात बसून केवळ बातमीत येण्यासाठी, मराठा समाजाला दाखवण्यासाठी ही तुमची नाटकं सर्वांना समजतात.”

हे ही वाचा 

जरांगे पाटलांचं हिंसेला समर्थन आहे का? नितेश राणे यांचा थेट सवाल

गणपतराव देशमुखांच्या नातवाने मराठ्यांसाठी केले मुंडण !

उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी- मुख्यमंत्री शिंदे यांची टीका

आमदारांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी, आमदारांनी “एक मराठा, लाख मराठा”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अश्या घोषणा दिल्या. आंदोलनकर्त्या आमदारांना ताब्यात घेऊन पोलिसांनी आझाद मैदान पोलिस चौकी येथे नेण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी