30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणून मूळव्याध सतत सतवतो आहे का? महापौरांचा भाजपला टोला

मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणून मूळव्याध सतत सतवतो आहे का? महापौरांचा भाजपला टोला

टीम लय भारी

मुंबई: मालाडमधील क्रीडा संकुलाला टीपू सुलतानचे नाव देण्यावरून राजकीय वाद पेटला आहे. “कालचा अख्खा दिवस कायदा सुव्यस्था बिघडवण्याचा होता. ज्यांनी यामध्ये कालच्या आंदोलनात उड्या मारल्या त्यांनी आधी, तुमचा विरोध २०१९ पासून सुरु आहे का याचे उत्तर द्यावे. आत्ताच या नावाला विरोध का होत आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा आहेत म्हणून मूळव्याध सतत सतवतो आहे असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगवाला आहे.(Mayor kishori pednekar slams BJP over continuous criticism)

मुंबईतील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करु नका असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपाला दिला आहे. बुधवारी क्रीडा संकुलाला टीपू सुलतानचे नाव देण्यावरुन मालाडमध्ये भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार अतुल भातखळकर आंदोलनासाठी उपस्थित होते. त्यानंतर गोंधळामध्येच पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन झाले.

हे सुद्धा वाचा

नितेश राणेंना जामीन नाकारल्यानंतर मिलिंद नार्वेकरांचे ट्वीट, म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयाचा नितेश राणेंना दणका

भाजपाने उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करु नये, संजय राऊतांचा इशारा

Mumbai mayor Kishori Pednekar rejects claims of corruption in Byculla zoo tendering process

आज मुंबईत दोन वर्षे करोनामध्ये सर्वच लोक होरपळून निघालो आहोत. त्यानंतर आता असे प्रकार सुरु आहेत. एक माजी आमदार दंगल होणार असे म्हणत आहे. दंगल कुणाला हवीय आणि करुन तर दाखवा. या मैदानाला नाव देण्याचा महापालिकेसोबत आणि आत्ताच्या राज्य सरकारसोबत संबंध नाही.

आमच्याकडे असा कुठलाही प्रस्ताव नाही त्यामुळे साप म्हणून दोरी आपटण्याचे काम भाजपाकडून सुरु आहे. या वादामध्ये सतत शिवसेनेला खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई अस्थिर करण्याच्या कामामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही विकास कामांकडे बघा. मी पुरावे देत आहे आणि ते खोटे वाटत असतील तर तुम्ही ते सिद्ध करा,” असे आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.

 “मुंबईमध्ये भाजपाच्या अध्यक्षतेखाली दोन रस्त्यांना नावे देण्यात आली होती. मुंबईची शांती कोणाला बिघडवायची आहे आणि कोणाला दंगल हवी आहे? एका नावावरुन एवढा मोठा वाद निर्माण करण्यात आला आहे. त्या नावाला अजून मान्यताच  दिलेली नाही किंवा दिली जाईल. झाशीची राणी लक्ष्मीबाई नाव देण्याची मागणी आमची आहे. त्या विभागातील नगरसेवकाला कोणते नाव द्यायचे हा अधिकार आहे.

ते नाव नागरिक सुचवतात असा आत्तापर्यंतचा नियम आहे. आम्ही सुचवलेल्या नावावर एक शब्दही बोलला जात नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसेंच्या पत्रामध्ये वीर टीपू सुलतान क्रीडांगण असा उल्लेख आहे. क्रीडा संकुलाला दिलेले नाव महापालिकेच्या अधिकृत पटलावर अद्याप नाही,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी