31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयसुप्रिया सुळेंच्या 'सेल्फी विथ पोटहोल्स' मोहिमेवरून मनसे नेते संदिप देशपांडेंची टिप्पणी

सुप्रिया सुळेंच्या ‘सेल्फी विथ पोटहोल्स’ मोहिमेवरून मनसे नेते संदिप देशपांडेंची टिप्पणी

टीम लय भारी

मुंबई : मनसे नेते संदिप देशपांडेंनी मुंबईतील रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. सुप्रिया सुळेंनी सेल्फी विथ पोटहोल्स ही मोहीम राबवली होती. या मोहिमेची त्यांना आठवण करून द्यायला हवी. निदान त्यांच्या भीतीने तरी खड्डे बुजवले जातील, असे विधान देशपांडेंनी केले आहे (MNS leader Sandeep Deshpande’s remarks on Supriya Sule’s ‘Selfie with Potholes’ campaign).

सुप्रिया सुळेंनी विरोधीपक्षात असताना २०१७ साली खड्ड्यांसोबतचे सेल्फी काढून ते ट्विटरवर शेअर केले होते. या ट्विटमध्ये सुळेंनी #selfiwithpothholes कटराज येथील अंडरी बायपास आणि भोपदेव घाट. अशा प्रकारचा मथळा सुप्रिया सुळेंनी लिहिला होता. विशेष म्हणजे त्यांनी हे फोटो त्या वेळचे राज्याचे महसूल मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना टॅग केले होते.

शिवसेना स्टाईलने उत्तर द्याच, मनसेचे आव्हान

मनसे – शिवसेनेमध्ये जुंपली, ‘मनसे’कडून पुन्हा आरोपांच्या फैरी

MNS leader Sandeep Deshpande's remarks on Supriya Sule
सुप्रिया सुळेंची २०१७ सालची ‘सेल्फी विथ पोटहोल्स’ मोहीम

आता महविकास आघाडीचे सरकार असताना मुंबईतील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. म्हणून देशपांडे यांनी सुप्रिया सुळेंना त्या वेळची त्यांची सेल्फी विथ खड्डे या मोहिमेची आठवण करून दिली आहे. आपल्या ट्विटर अकाउंटवरून सुप्रिया सुळेंचा रस्त्यावरील खड्ड्यांसोबतचा जुना फोटो संदिप देशपांडेंनी शेअर केला आहे. ‘ताई काही जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा का?’ असा प्रश्न ही देशपांडेंनी सुप्रिया सुळेंना केला आहे.

गोपीचंद पडळकरांनी घेतला मोठा निर्णय, सामाजिक उपक्रम व गरजूंना मदत करण्याची केली सहकारी मित्रांना विनंती

Maharashtra: MNS decides on ‘seat adjustment’ with BJP for Palghar local body byelections

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी