31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयअतिवृष्टीने बेहाल जनतेच्या मदतीसाठी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सरसावले, नाना पटोलेंनी केले कौतुक

अतिवृष्टीने बेहाल जनतेच्या मदतीसाठी कॉंग्रेसचे कार्यकर्ते सरसावले, नाना पटोलेंनी केले कौतुक

टीम लय भारी

मुंबई:- महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले आहे, राज्यातील अनेक ठिकाणी पूर आला आहे. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, आकोला येथील लोकांची परिस्थितीत बिकट झाली आहे. जनतेच्या मदतीसाठी नेहमी काँग्रेस अग्रेसर असते पावसामुळे लोकांचे हाल होऊ लागले आहेत, अशा वेळी काँग्रेसचे कार्यकर्ते लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. अतिवृष्टीने बेहाल जनतेच्या मदतीसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते सरसावले आहेत. त्यांच्या या कार्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कौतुक केले आहे (Nana Patole lauds Congress workers for help).

महाराष्ट्रावर कधीही संकट आले की कॉंग्रेसचे कार्यकर्ते नेहमी तत्पर असतात असे नाना पटोले म्हणाले आहेत. आपल्या कार्यकर्त्यांना जनसेवा करण्यासाठी नाना पटोले नेहमी प्रोत्साहान देत असतात. कोल्हापूर आणि आकोला येथील आपल्या कार्यकर्त्यांच्या कामाचे कौतुक करत नाना पटोले यांनी ट्विट केले आहे (Nana Patole tweeted praising the work of the activists).

राज्यातील अतिवृष्टीसाठी केंद्राकडून मदत मिळणार, पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन

Breaking : पुरग्रस्तांच्या मदतीसाठी नौदलाची धाव, 7 तुकडया रायगड, रत्नागिरीला रवाना

Nana Patole lauds Congress workers for help
नाना पटोले

महाराष्ट्रावर कधीही संकट आले की काँग्रेसचे कार्यकर्ते हे जनसेवेत तत्पर असतात. कोल्हापूर येथे आमदार ऋतुराज पाटील, आकोला येथे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते साजिद पठाण व कोकण भागात सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते आलेल्या पुर परिस्थितीत लोकांची मदत करीत आहेत व अन्नधान्य वितरण केले. असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे.

कोल्हापूर मध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वतः संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच लोकांच्या गरजेचे सामान ते स्वतः लोकांपर्यंत पोहचवत आहेत. आपल्या कामाचे कौतुक होत हे पाहून प्रत्येकाला आनंद होतो. नाना पटोले यांनी ऋतुराज पाटील यांच्या कामाचे ट्विट करून कौतुक केले आहे. त्यावर ऋतुराज पाटील यांनी ट्विट केले आहे.

Video : मंत्री एकनाथ शिंदे, IAS राजेश नार्वेकर यांची कल्पकता; अन् एक्साईज खात्याची धडक कारवाई\

Mumbai: Turn anger into strength if friends backstab us, Nana Patole tells Congress workers

संकटकाळी पूर्ण ताकदीने लोकांना मदत करणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी आहे असे मी मानतो ! काँग्रेस संस्कृतीनुसार आपल्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या सेवेसाठी सदैव कार्यरत राहायचा प्रयत्न करत आहे. हे संकट लवकरात लवकर टळू दे हीच प्रार्थना! असे ट्विट ऋतुराज पाटील यांनी केले आहे (Tweeted by Rituraj Patil).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी