32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयपंचायत समितीत काँग्रेसची मुसंडी! नाना पटोले म्हणाले…

पंचायत समितीत काँग्रेसची मुसंडी! नाना पटोले म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई : राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये ५ ऑक्टोबरला झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची आज (६ ऑक्टोबर) मतमोजणी होत आहे. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या ही पोटनिवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची असल्यानं सर्वांनीच ताकद लावलेली दिसली. त्यामुळे या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय (Nana Patole reaction to the Panchayat Samiti by-election).

नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिमच्या जिल्हा परिषदेसाठी मतमोजणी होत आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागांचा आणि १४४ पंचायत समितीच्या जागांचा निकाल घोषित होत आहे.

प्रियंका गांधींना सन्मानाने तुरुंगातून सोडले नाही तर, महाराष्ट्रात काँग्रेस जेल भरो आंदोलन करणार : नाना पटोले

केंद्रातील मोदी व उत्तर प्रदेशातील योगी सरकार बरखास्त करा : नाना पटोले

दरम्यान, पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. “काँग्रेसने चांगल काम केलं. त्याचंच फळ आजच्या निकालात पाहायला मिळत आहे. देशात भाजपाची वागणूक, शेतकरी विरोधी धोरण, बहुजनांच्या विरोधातील धोरण, देशाला विकण्याची जी पॉलिसी भाजपाने सुरु केली आहे. त्या व्यवस्थेला फक्त  काँग्रेसचं थांबवू शकतं हे जनतेचं मत आहे,” असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात केलेले विधान गंमतीत केले : नाना पाटोले

BJP govt at Centre, Uttar Pradesh ‘scared’ of Gandhi siblings, says Congress leader Nana Patole

आतापर्यंतच्या निकालात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. पंचायत समितीत काँग्रेस ३३ तर भाजपा २६ जागांवर आहे. तर नागपूर पंचायत समितीत देखील काँग्रेसला सर्वाधिक जागा आहेत. यावर बोलतांना नाना पटोले म्हणाले, “निवडणुका येतील जातील काँग्रेसने सत्तेचे गोडवे फार काळ ठेवले नाही. आम्ही सत्ता खूप पाहीली आहे. त्यामुळे आम्हाला यात रस नाही. पण आज व्यवस्था अडचणीत आली आहे. केंद्र सरकारचा दुजाभाव आहे. तुम्ही गुजरातला १ कोटी देऊ शकता तर महाराष्ट्राला का नाही. शेतकऱ्यांची अवस्था फार वाईट आहे.”

पंचायत समितीत काँग्रेसची मुसंडी! नाना पटोले म्हणाले…

स्वबळाचा नारा नाना पटोले यांनी दिला होता. त्यावेळी फार काही पाठींबा त्यांना मिळाला नव्हता आता पोटनिवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीत मोठा भाऊ आहे हे ठरल्यानंतर स्वबळाचा नारा राहणार आहे का?, यावर नाना पटोले म्हणाले, “मै चला था अकेला लोग जुड़ते गये कारवां बनता गया, काँग्रेस हा तळागाळतील पक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा काँग्रेस एक नंबरचा पक्ष होईल. त्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे.”

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी