33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयमुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात केलेले विधान गंमतीत केले : नाना पाटोले

मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या कार्यक्रमात केलेले विधान गंमतीत केले : नाना पाटोले

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबादच्या कार्यक्रमात बोलत असताना विरोधकांना भावी सहकारी म्हटले होते. या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी ते विधान गमतीत केलं असावं (Nana Patole said that CM said in an Aurangabad event was just a joke). 

एखाद्या गोष्टीची गमंत करणं, जोक करणं हा मुख्यमंत्र्यांचा स्वभावाचं आहे. त्यामुळे त्यांनी हे विधान गंमतीत केलं असावं असे पाटोले म्हणाले. नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच नव्हे तर काँग्रेस नेत्यांचे सुद्धा घोटाळे बाहेर येणार : चंद्रकांत पाटील

हसन मुश्रीफांना भाजपने प्रवेशाची ऑफर न दिल्याचा चंद्रकांत पाटलांचा दावा

Nana Patole said CM said in Aurangabad event was joke
मुख्यमंत्र्यांनी ते विधान गमतीत केलं असावं

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर होते. या कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील उपस्थित होते. यावेळी दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले होते की, ” मंचावर उपस्थित आजी- माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी.”

स्पर्धा होण्यापूर्वीच प्रथम क्रमांक देऊन मोकळ्या, पी ए बदलण्याचा नेटकऱ्यांनी दिला सल्ला

Will waive water & electricity bills of farmers, says Punjab CM Charanjit Singh Channi in first presser

नाना पटोले यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या हे स्टंट करत आहेत. लोकांची दिशाभूल करत आहेत. तसेच केंद्र सरकारवर लोकांची नाराजी आहे. म्हणून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची ही नौटंकी सुरु आहे, असे पटोले म्हणाले. तसेच सोमय्या यांनी भाजप नेत्यांचेही भ्रष्टाचार उघड करावेत. जेणेकरून सोमय्या यांना महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद मिळतील असे ही पटोले म्हणाले.

तसेच आता मविआ सरकार एकत्र येऊन फडणवीस सरकारच्या काळातील फायली बाहेर काढणार आहे. असे म्हणत नाना पटोले यांनी भाजपला इशारा दिला आहे. यावेळी पाटोले यांनी चंद्रकांत पाटलांच्या रस्ते घोटाळ्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील यांनी स्वतः खाल्ले, पण कोणाला दिसून आले नाही. असे म्हणत पटोले यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर ही निशाणा साधला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी