33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयनवाब मलिकांचे क्रांती रेडकरच्या बहिणीवर गंभीर आरोप, वानखेडेंनी दिले यावर स्पष्टीकरण

नवाब मलिकांचे क्रांती रेडकरच्या बहिणीवर गंभीर आरोप, वानखेडेंनी दिले यावर स्पष्टीकरण

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मेहुणीवर गंभीर आरोप केले आहे. समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर या ड्रग्जच्या व्यवसायात आहेत का? त्यांची केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. यावर तुम्ही उत्तर द्या. असे ट्विट करत मलिकांनी सर्व पुरावे सादर केले आहे. मात्र मलिकांच्या या आरोपांवर समीर वानखेडे यांनी सप्ष्टीकरण दिले आहे (Sameer Wankhede’s explanation on Nawab Malik’s allegations).

‘२००८ साली जेव्हा हे प्रकरण घडले त्या वेळी मी एनसीबीच्या सेवेत नव्हतो. तसेच मी २००१७ सालामध्ये क्रांती रेडकर सोबत लग्न केले होते. मग मी या केस सोबत कसा काय जोडला जाऊ शकतो?’ असा सवालच वानखेडे यांनी मलिकांना केला आहे.

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? एनसीबीविरोधात अजून एक पंच समोर, कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा दावा

मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट, समीर वानखेडेंवर होणार गुन्हा दाखल?

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात १.२५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. परंतु, असे असूनही मलिक यांनी वानखेडे परिवारांवर आरोपांची सरबत्ती सुरूच ठेवली आहे.

“बात निकलेगी तो फिर…”, नवाब मलिक यांच्या नव्या ट्वीटमुळे पुन्हा खळबळ

Sameer Wankhede part of Aryan Khan kidnap plot, says NCP minister Nawab Malik; officer denies claim

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी