33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयमंत्रालयासमोर एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा केला प्रयत्न

मंत्रालयासमोर एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा केला प्रयत्न

टीम लय भारी

मुंबई : मुंबईतील मंत्रालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मंत्रालयाच्या प्रवेश द्वाराजवळ एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा करत त्याने स्वतःवर ज्वलनशील द्रव्य टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे (OBC reservation was the reason, a man tried to burn himself in front of the ministry).

संबंधित व्यक्ती सुरक्षित असून तिला तेथील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेमुळे मंत्रालयाच्या आवारात एकच खळबळ माजली होती. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांमध्ये ओबीसी वर्गासाठी आता पर्यंत आरक्षण धोरण लागू होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने हे धोरण रद्द ठरवले होते. त्यामुळे ओबीसी वर्गात नाराजी पसरली होती. याच पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तीने स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला होता, असे तपासा दरम्यान समोर आले.

Politics in Mantralaya : मंत्र्यांच्या पीएस, ओएसडींना सहा महिन्यांपासून पगारच नाहीत

Mantralaya : ‘कोरोना’मुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या दांड्या, सरकारने काढल्या ‘नोटीसा’

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. ४ मार्च २०२१ रोजी झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द केलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना मिळणारं २७ टक्के राजकीय आरक्षण यापुढील निवडणुकीत देता येणार नाही.

मंत्रालय समुद्रात डुबणार !

Maharashtra government extends family court jurisdiction to 23 newly merged villages under PMC

मंत्रालयासमोर एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेण्याचा केला प्रयत्न

वाशिम, भंडारा, अकोला, नागपूर आणि गोंदिया या पाच जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी उमेदवारांची निवडणूक सुप्रीम कोर्टाने रद्द केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर महाराष्ट्र सरकारने कोर्टात आपली बाजू नीट मांडली नसल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी