28 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकीयपांडुरंग बरोरांनी केली मुख्यमंत्र्यांची कोंडी

पांडुरंग बरोरांनी केली मुख्यमंत्र्यांची कोंडी

सव्वा वर्षापूर्वी 40 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. याला त्यांच्या गटाचे प्रवक्ते ‘उठाव’ म्हणत असले तरी या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वजन वाढले. उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटाच्या शिवसेनेत दाखल झाले. आमिषे, पोलिसांचा दबाव टाकून शिंदे गटाने आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी पळवले, असा आरोप ठाकरे गटाने वारंवार केला. एकनाथ शिंदे गटात दर आठवड्यात शिवसेनेसह इतर पक्षातून इनकमिंग जोरात सुरू असतानाच, शहापूर विधानसभेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिंदे गटाला रामराम करत पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. एकेकाळी शिवसेनेचे आमदार असणाऱ्या दौलत दरोडा यांना गेल्या विधानसभेचे शिवसेनेने तिकीट न दिल्याने ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे राहत आमदार झाले. त्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादीचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे शिवसेनेत गेले होते. त्यानंतर ते एकनाथ शिंदे गटात गेले. शिंदे गटात फारसे काही पदरी पडले नसल्याने ते स्वगृही परतले आहेत. पण राष्ट्रवादीत परतून बरोरा यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची कोंडी केल्याचे बोलले जाते.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झालेले दौलत दरोडा आता अजित पवार गटात आले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभा मतदार संघात मोठाच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि दौलत दरोडा यांचे पटत नाही. त्यामुळे जर युती झाली तर दरोडा यांच्यासाठी शिंदे गट प्रचार करतील का, हा सवाल उपस्थित होत आहे. शहापूर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (आदिवासी) राखीव आहे. या मतदार संघात कॉंग्रेस चारवेळा, शिवसेना तीनदा, राष्ट्रवादी कॉँग्रेस दोनदा, निवडून आले आहेत. एकदा शेतकरी कामगार पक्षाचा आमदार झाला तर एकदा अपक्ष आमदार निवडून आला.

इतिहास शहापूर विधानसभेचा 

या मतदार संघात 1976 मध्ये अपक्ष पी.आर. पाटील निवडून आले. 1972मध्ये कॉँग्रेसचे श्रीरंग शिंगे विजयी झाले. 1978 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कृष्णकांत तेलंग आमदार झाले. 1980 ते 1990 असे सलग तीन वेळा कॉँग्रेसचे महादू बरोरा आमदार झाले. त्यानंतर 1995 ते 1999 मध्ये दौलत दरोडा हे शिवसेनेचे आमदार झाले. 2004 मध्ये महादू बरोरा आमदार झाले. यांनी या मतदार संघाचे नेतृत्व तीनदा कॉँग्रेसकडून तर एकदा राष्ट्रवादीकडून केलेले आहे. 2009 मध्ये शिवसेनेचे दौलत दरोडा आमदार झाले. त्यानंतर 2014 मध्ये पांडुरंग बरोरा आमदार झाले. 2019 मध्ये शिवसेनेने तिकीट न दिल्याने दौलत दरोडा राष्ट्रवादीत गेले आणि आमदार झाले.

हे सुद्धा वाचा
ड्रगमाफिया ललित पाटीलच्या डोक्यावर कुणाचा हात?
मुख्यमंत्री शिंदे समाजवादी संघटनांबद्दल काय म्हणाले?
पाकिस्तानी टीमचा ‘ताप’ का वाढला?

बरोरांची डाळ शिजली नाही 

2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह भाजपला पाठिंबा दिला आणि ते मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक खासदारांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेसचे राज्यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी शिंदे गटात आले. शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी ‘राजकीय सोय’ म्हणून शिंदे गटाचा हात पकडला. पण शिंदे गटात त्यांची फारशी डाळ शिजली नाही. त्यामुळे त्यांनी स्वगृही परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शहापूर विधानसभा मतदार संघात दरोडा आणि बरोरा हे दोघेही मातब्बर असल्याने कोण निवडून येतो हे पहावे लागणार आहे.

निवडणूक काटे की टक्कर ठरणार

भविष्यात भाजपा- एकनाथ शिंदे गट शिवसेना आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची युती झाली तर विद्यमान आमदार दौलत दरोडा हे दावेदार असतील. या दरोडांबरोबर शिंदे यांचे सख्य नाही. अशावेळी एकनाथ शिंदे गट वेगळा उमेदवार देणार की, दरोडा यांना पाठिंबा देणार वा पांडुरंग बरोरा यांना मागून सपोर्ट करणार याचे चित्र येत्या काही महिन्यात समोर येईल. मात्र यंदाची शहापूर विधान सभेची निवडणूक काटे की टक्कर ठरणार आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी