31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयएम्स हॉस्पिटल प्रकरणाबाबत अतुल लोंढेंनी अमित शहांना सुनावली खरी खोटी

एम्स हॉस्पिटल प्रकरणाबाबत अतुल लोंढेंनी अमित शहांना सुनावली खरी खोटी

राजकारणात आरोप प्रत्यारोप सतत पाहायला मिळतात. सत्ताधारी विरोधकांवर तर विरोधक सत्ताधार्यांवर टिकेचे बाण सोडताना दिसतात. आगामी निवडणूक लक्षात घेता. आता सर्वच पक्ष एकमेकांवर ताशेरे ओढत आहेत. अशातच आता प्रदेश कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंनी भाजपचे नेते अमित शहा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. अमित शहांनी एका ठिकाणी एम्स हॉस्पिटल हे सर्वात आधी गुजरात येथे स्थापन करण्यात आले असे वक्तव्य केले होते, यावर आता छत्तीसगड येथील एका बैठकीत असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते पटाईत आहेत, ते तोंडावर बोलतात आणि आपटतात, असे विधान करुन त्यांनी अमित शहांवर आसूड सोडले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ज्येष्ठ नेते अमित शहा नेहमी खोटे बोलतात आणि तोंडावर आपटतात. भारतीय जनता पक्षाचे नेते खोटे बोलण्यात पटाईत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात मोदी सरकारच्या आधी एकही एम्स नव्हते अशी थाप मारली. मात्र आता अमित शहा यांना माहित नसावे की पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी देशातील पहिले एम्स दिल्लीत १९५३ साली सुरु केले आणि आजही ते पहिल्या नंबरवर आहे, असे प्रत्युत्तर देत अमित शहांना प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंनी कान शेकले आहेत.

हेही वाचा

गाझा रुग्णालयातील 500 जीवांचे मारेकरी कोण?

राष्ट्रीय पुरस्कार पटकावताना लग्नातली साडी नेसली… काय म्हणाली आलिया भट्ट

ड्रग्जमाफिया ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक, ड्रग्जच्या रॅकेटचे गूढ उलगडणार?

या भागात उघडण्यात आलीत एम्स हॉस्पिटल 

भाजपाचा खोटेपणा उघड करताना अतुल लोंढे यांनी देशातील एम्सची यादीच वाचून दाखवली आहे. दिल्ली, जोधपूर, भुवनेश्वर, ऋषीकेश, पटणा, भोपाळ, रायपूर आणि रायबरेली येा ठीकाणी एम्स हॉस्पिटल उघडण्यात आली आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची २०१४ साली दिल्लीत सत्ता येण्याआधीच या एम्सची हॉस्पिटल उभारणी करण्यात आलेली आहे. एम्सबरोबरच, आयआयएम, डीआरडीओ, आयआयटी या संस्थांचा पाया पंडित जवाहरलाल नेहरु यांनीच घातला असून त्यावर देश उभा राहिला.

मोदी-शहांना काहीच येत नाही

निवडणुकीच्या प्रचारात बिनधास्त खोटे बोलून लोकांची दिशाभूल करण्याचा मोदी-शहा प्रयत्न करत असतात पण जनता डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. बिहारमध्ये एम्स सुरु केल्याची बतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली होती तसेच केरळातही एम्स सुरु केल्याचे सांगितले पण दोन्ही ठिकाणच्या लोकांनी शहानिशा करुन मोदींच्या दाव्यातील हवा काढली. खोटं बोल पण रेटून बोल तसेच जुमलेबाजी करणे शिवाय मोदी-शहांना काहीच येत नाही, असा टोलाही लोंढे यांनी लगावला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी