28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeराजकीयटि्टवरच्या ‘ब्लू टिक’ कडे लक्ष देण्यापेक्षा लसीकरणाकडे अधिक लक्ष द्या; राष्ट्रवादीचा केंद्राला...

टि्टवरच्या ‘ब्लू टिक’ कडे लक्ष देण्यापेक्षा लसीकरणाकडे अधिक लक्ष द्या; राष्ट्रवादीचा केंद्राला खोचक टोला

टीम लय भारी

मुंबई :-  टि्टवरच्या ‘ब्लू टिक’ (‘Blue tick’) वरून भाजप आणि ट्विटमध्ये चांगलीच जुंपली आहे. यावर सर्वात प्रथम कॉंग्रेसने भाजपवर खोचक टीका केली होतीच परंतु आता राष्ट्रवादीने देखील भाजपला खोचक टोला लगावला आहे. टि्टवरच्या ‘ब्लू टिक’ कडे लक्ष देण्यापेक्षा लसीकरणाकडे अधिक लक्ष द्या; राष्ट्रवादीने केंद्राला खोचक टोला लगावला आहे(Pay more attention to vaccinations than to the ‘blue tick’ on Twitter; The NCP has slammed the Center).

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही टीका केली आहे. ‘ब्लू टिक’ (‘Blue tick’) आणि लसीकरण (Vaccination) यातील फरक पहिल्यांदा केंद्रसरकारने (Central Government) समजून घ्यावा, असे सांगतानाच ‘ब्लू टिक’ (‘Blue tick’) पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे (Vaccination) जास्त लक्ष द्यायला हवे, असा  खोचक टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

राऊतसाहेब, म्हणूनच तुम्ही ते ट्वीट रिट्विट केलंत ना?; भाजपचा राऊतांना खोचक टोला

या कारणामुळे देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडेल : नवाब मलिक

Government fighting for ‘blue tick’ amid vax crisis: Rahul Gandhi

सरकार आपल्याच अंहकारात मश्गूल

ट्वीटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार (Central Government) ‘ब्लू टिक’ (‘Blue tick’) ची लढाई लढताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची (Vaccination) लढाई लढत आहेत. ट्विटरवरील ‘ब्लू टिक’ (‘Blue tick’) असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण (Vaccination) असेल यावरून केंद्रसरकारवर (Central Government) टीकेची झोड उठवली जात आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करून केंद्रसरकार (Central Government) आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राहुल गांधींची टीका

ब्लू टिकच्या (Blue tick) मुद्दयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. ब्लू टिकसाठी (Blue tick) मोदी सरकार संघर्ष करत आहे. कोविडची लस हवी असेल तर आत्मनिर्भर व्हा, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. तसेच या पोस्टला प्रायोरिटी (#Priorities) हा हॅशटॅगही त्यांनी वापरला होता. यातून त्यांनी सरकार कशाला प्राधान्य देतंय हे सूचित करायचे होते.

काय आहे प्रकरण?

ट्विटरने काल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचे वैयक्तिक ट्विटर हँडल आधी अनव्हेरिफाईड केले आणि नंतर पुन्हा व्हेरिफाईड केले. ट्विटरने असे का केले ते आधी सांगितले नाही. पण पुन्हा ब्लू टिक (Blue tick) प्रस्थापित केल्यानंतर का हटवली ते सांगितले. पण नायडूंना आधी जो धक्का दिला तो फक्त त्यांनाच दिला असे नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही काही नेत्यांना ट्विटरने अनव्हेरिफाईड केले. म्हणजे अकाऊंटची सत्यता काढून टाकली आहे. यात संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख अरूण कुमार आणि सह सरकार्यवाह सुरेश सोनी यांच्या ट्विटर हँडलचा समावेश आहे. नायडूंची ब्लू टिक (Blue tick) का हटवली ते ट्विटरने स्पष्टपणे सांगितले, पण संघाच्या नेत्यांची का हटवली ते मात्र सांगितलेले नाही. त्यामुळे मोदी सरकार आणि ट्विटर यांच्यातला संघर्ष आणखी वाढला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी