31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयपीएम केयर्स फंडवर सुप्रीम कोर्टचे माजी जस्टीस मदन लोकूर यांचा केंद्रावर सवाल

पीएम केयर्स फंडवर सुप्रीम कोर्टचे माजी जस्टीस मदन लोकूर यांचा केंद्रावर सवाल

टीम लय भारी

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे माजी जस्टीस मदन लोकूर यांनी पीएम केयर्स फंडवर प्रश्न उपस्थित केला आहे. या निधीत येणारे पैसे कुठे जातात आणि कुठे खर्च केले जात आहेत. या संबंधात माहिती न मिळाल्याने लोकूर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. माहिती अधिकारच्या एका कार्यक्रमात बोलत असताना लोकूर यांनी पीएम केयर्स फंडच्या अपारदर्शकतेवर केंद्रावर प्रश्न उठवला आहे (PM care fund was the reason that former Supreme Court Justice Madan Lokur questions to central government).

मोठं मोठ्या कंपन्यांकडून जमा होणारे करोडो रुपये कुठे खर्च केले जात आहेत. याबाबतची माहिती पब्लिक डोमेनमध्ये नाही. त्यामुळे पीएम केयर्स फंडमध्ये जमा होणारे पैसे कुठे खर्च होतात याची माहिती आम्हाला नाही. असे लोकूर यावेळी म्हणाले.

‘सावरकरांनी राजनाथसिंह यांच्या स्वप्नात येऊन माफीनामा का दिला, हे सांगितले का ?’

शरद पवारांनी देवेंद्र फडणविसांना पाजले बाळकडू

पुढे लोकूर असे ही म्हणाले की, पीएम केयर्स फंडमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी पैसे दान केले आहे. तसेच कॉरपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीला (CSR) पीएम केयर्स फंडमध्ये रूपांतरित केले आहे. परंतु या निधीत जमा होणारे पैसे कुठे खर्च होतात हे आम्हाला माहित नाही. आम्हाला सांगण्यात आले की, या निधीचा वापर कोविड-१९ साठी वापरण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.

Maratha Reservation : संभाजीराजेंनी दिला इशारा, म्हणाले…

पीएम केयर्स फंड को लेकर सुप्रीम कोर्ट के पूर्व जस्टिस लोकुर ने सरकार पर क्या सवाल उठा दिए?

पीएम केयर्स फंडवर सुप्रीम कोर्टचे माजी जस्टीस मदन लोकूर यांचा केंद्रावर सवाल

माहिती अधिकार कायद्याला १६ वर्ष पूर्ण होण्याच्या उद्देश्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकूर यांनी केंद्र सरकारच्या पीएम केयर्स फंडवर प्रश्न उपस्थित केला. लोकूर यांनी आपल्या सुरवातीच्या भाषणात नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित फिलीपींसची पत्रकार मारिया रेसा यांच्या एका कोटने केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी