27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयदेशमुखांच्या घरी पाचवेळा छापा मारण्याचा विक्रम, शरद पवारांचा टोला

देशमुखांच्या घरी पाचवेळा छापा मारण्याचा विक्रम, शरद पवारांचा टोला

टीम लय भारी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या कथित शंभर कोटी वसूली प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयने तब्बल पाचव्यांदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापा टाकला. (sharadd pawar was talking about deshmukh)

विशेष म्हणजे पैशांच्या अफरातफर प्रकरणी ईडीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपास यंत्रणेंकडून सुरु असलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसते अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. शरद पवार यांनी आज (13 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सध्याच्या देशातील विविध घटनांवर आपली रोखठोक भूमिका मांडली.

पीएम केयर्स फंडवर सुप्रीम कोर्टचे माजी जस्टीस मदन लोकूर यांचा केंद्रावर सवाल

‘सावरकरांनी राजनाथसिंह यांच्या स्वप्नात येऊन माफीनामा का दिला, हे सांगितले का ?’

अनिल देशमुखांविरोधातील कारवाईवर पवार sharadd pawar नेमकं काय म्हणाले?

‘सगळ्या तपास यंत्रणांचा वापर राजकीय दृषीनं केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांबद्दल त्यावेळचे मुंबई पोलीस आयुक्तांनी आरोप केले होते. त्याबाबत मलाही त्यांनी माहिती दिली होती. त्यांच्या आरोपामुळे वातावरण तयार झालं त्यामुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. आरोप करणारे कुठे आहेत त्याचा आज पत्ता नाही. जबाबदार अधिकारी बेछुटपणे आरोप करतो हे राज्यात पहिल्यांदाच घडत आहे. देशमुखांनी जबाबदारी ओळखून राजीनामा दिला. ते बाजूला झाले आणि हे गृहस्त गायब झाले. हा फरक आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“आता अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचं काम सुरु आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा टाकला. मला कौतुक वाटतं त्या एजन्सीचं. पाच वेळा एकाच घरात चौकशी करणं किती योग्य याचा विचार जनतेनंच करायला हवा”, अशा शब्दात पवारांनी निशाणा साधला.

देशमुखांशी संबंधित ठिकाणी टाकलेल्या धाडी

पहिली धाड: 25 मे 2021

25 मे 2021 रोजी ईडीने सर्वात पहिली धाड टाकली होती. नागपूर येथील शंकर नगर, छावणी भाग आणि जाफर नगर या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिवाजी नगर भागातील हरेकृष्ण अपार्टमेंटमध्ये धाड टाकण्यात आली होती. ही कारवाई प्रामुख्याने सागर भटेवार यांच्याशी संबंधित ठिकाणी करण्यात आली होती. सागर भतेवार हे अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

दुसरी धाड: 25 जून 2021

या दिवशी ईडीने आठ ठिकाणी टाकल्या होत्या. या धाडी थेट अनिल देशमुख यांच्यावर होत्या. अनिल देशमुख यांचं वरळी सुखदा इमारतीतील घर, ज्ञानेश्वरी बंगला त्याच प्रमाणे त्यांच्या एका कार्यलयावर धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे सेक्रेटरी संजीव पालांडे, कुंदन शिंदे यांच्याशी संबंधित ठिकाणीही धाडी टाकण्यात आल्या होत्या. याच कारवाईत पालांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली होती. या कारवाईवेळी देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

तिसरी कारवाई: 2 जुलै 2021

माण तहसीलदार कार्यालयात मध्यस्थांचा सुळसुळाट

sharad pawar

Sharad Pawar: Centre failed to destabilise Maharashtra govt, now raiding kin of our leaders

2 जुलै रोजी ईडीने तिसऱ्यांदा अॅक्शन घेतली. अनिल देशमुख यांना समन्स देण्यासाठी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी गेले होते. मात्र, त्या दिवशी देशमुख सापडले नाहीत.

चौथी कारवाई: 6 ऑगस्ट 2021

6 ऑगस्ट रोजी ईडीने चौथ्यांदा कारवाई केली. ईडीने देशमुख यांच्या ट्रस्ट कार्यलयासह इतर दोन ठिकाणी आज कारवाई केली आहे.

पाचवी धाड – 17 सप्टेंबर 2021

अनिल देशमुख यांच्या घर-कार्यालयांवर आता आयकर विभागाने धाडी टाकल्या. अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबई, तसंच त्यांच्या मालकीच्या कॉलेजवर आयकर विभागाने छापे ठाकले.

शरद पवारांची लखमीपूर प्रकरणावर प्रतिक्रिया

“उत्तर प्रदेशातील बातम्या आपण वाचतो, पाहतो आहोत. लखीमपूरच्या घटनेचे काही व्हिडीओ सुदैवानं समोर आलं. त्यातून एक दिसलं की शांतपणे जाणाऱ्या जमावावर काही लोकांकडून गाडी घातली जाते. त्यात चार शेतकऱ्यांची, काही लोकांची आणि एका पत्रकाराची हत्या होते. काही लोकांनी सांगितलं की केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचे चिरंजीव त्या गाडीत होते. ते नाकारलं गेलं. पाच-सहा दिवसानंतर सर्वोच्च न्यायालयानं प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक करावी लागली आणि हे सर्वोच्च न्यायालयानं प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर घडलं”, असं शरद पवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी