31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
HomeराजकीयPM मोदींनी बदलला स्वत:चा डीपी; स्वत:च्या फोटोऐवजी ठेवलाय ‘हा’ फोटो

PM मोदींनी बदलला स्वत:चा डीपी; स्वत:च्या फोटोऐवजी ठेवलाय ‘हा’ फोटो

टीम लय भारी

नवी दिल्ली:  भारताने १०० कोटी करोना लसींच्या डोसचा टप्पा पार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा फोटो बदलला आहे. पंतप्रधानांनी आपल्या फोटोद्वारे देशवासियांचे १०० कोटी लसी घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचे रंग ‘तिरंगा’ देखील फोटोमध्ये आहे. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी देशाने करोना लसीकरणाचा १०० कोटींचा आकडा पार करून विक्रम केला आहे. या ऐतिहासिक विक्रमासाठी देशातील सर्व नेत्यांनी देशाचे अभिनंदन केले आहे (PM Modi changes his DP on twitter).

देशात १०० कोटी लसीकरणाच्या आनंदात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुक आणि ट्विटरवर त्यांचे प्रोफाईल फोटो बदलला आहे. पंतप्रधानांनी एका नवीन फोटोद्वारे भारताचे अभिनंदन केले आहे, ज्यात कोविड -१९ च्या विरोधात १०० कोटी डोस लिहिले गेले आहेत. एवढेच नाही तर फोनवर ऐकली जाणारी करोनासंदर्भातील कॉलर ट्यून आता बदलली आहे.

PM Modi : पंतप्रधान मोदींनी सांगितले, ‘निवडणुका जिंकण्याचे रहस्य आणि मुख्यमंत्री कोण होणार’

PM मोदींच्या मतदारसंघात लसीची वाहतूक करताना जे घडल ते पाहून डोक्यावर हात माराल !

PM Modi changes his DP from twitter account
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबुक आणि ट्विटरवर त्यांचे प्रोफाईल फोटो बदलला आहे

लसीकरणाच्या विक्रमानंतर तुमच्या मोबाईलमध्ये प्ले होणारी कॉलर ट्यून देखील बदलली आहे. आता जर तुम्ही फोन केला तर तुम्हाला लसीकरण मोहिमेचा यशस्वी संदेश ऐकायला मिळेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जेव्हापासून देशात करोना महामारीने आली, तेव्हापासून मोबाइल फोन वापरकर्त्यांना करोना महामारीबाबत सतर्क करण्यासाठी कॉलर ट्यून ऐकायला जात होती. मात्र, बऱ्याच वेळा लोकांना याचा कंटाळा आला आहे आणि तक्रारही केली आहे. काही लोकांनी कॉलर ट्यून काढण्यासाठी कोर्टात धावही घेतली होती.

Rohit Pawar : आ. रोहित पवारांकडून PM मोदींच्या ‘या’ निर्णयाच स्वागत, केली ‘ही’ विनंती

PM Modi address to nation Live Updates: ‘Science-born, science-driven, science-based’, Modi on India’s vaccination programme

याआधी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०० कोटी लसीकरणासाठी देशाचे अभिनंदन केले होते. त्यांनी ट्विटरवर लिहिले, “भारताने इतिहास घडवला. आम्ही भारतीय विज्ञान, उद्यम आणि १३० कोटी भारतीयांच्या सामूहिक भावनेच्या विजयाचे साक्षीदार आहोत. लसीकरणात १०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल भारताचे अभिनंदन. आमच्या डॉक्टर, परिचारिका आणि ज्यांनी ही कामगिरी साध्य करण्यासाठी काम केले त्या सर्वांचे आभार,” असे पंतप्रधांनांनी म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी