31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमंत्रालय१० लाख लाच प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्याला पोलीस कोठडी, पीडब्ल्यूडीच्या दोन अधिकाऱ्यांना...

१० लाख लाच प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्याला पोलीस कोठडी, पीडब्ल्यूडीच्या दोन अधिकाऱ्यांना तूर्त दिलासा

टीम लय भारी

मुंबई : तब्बल १० लाख रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी रमेश शाह या माहिती अधिकार कार्यकर्त्याला न्यायालयाने २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे, तर संशय असलेल्या दोन पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचा या प्रकरणात संबंध नसल्याचे सकृतदर्शनी आढळून आल्याने त्यांच्यावरील कारवाई तूर्त टळली असल्याचे सूत्रांनी सांगितले (PWD two officers get immediate relief from 10 lakh bribery cases).

रमेश शाह हा माहिती अधिकार कार्यकर्ता आहे, तसेच पत्रकार असल्याचेही तो सांगत असतो. एका ठेकेदाराला ब्लॅकमेल करून त्याने १० लाख रुपयांची मागणी केली होती. त्याबाबत संबंधित ठेकेदाराने शाह याच्या विरोधात पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हे शाखा व लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी शाह याच्या विरोधात सापळा लावला होता.

पीडब्ल्यूडीचे दोन अधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ता १० लाखाची लाच घेताना ACB च्या जाळ्यात

पीडबल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यालाच लावला चूना, बोगस कामे करून लाखो रूपये लाटले

पीडब्ल्यूडीच्या अंधेरी येथील कार्यालयातच शाह याने संबंधित ठेकेदाराकडून १० लाख रुपयांची लाच स्विकारली. त्यावेळी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याला गुरूवारी न्यायालयात हजर केले असता २६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी ठोठावल्याचे सूत्रांनी सांगितले.

पीडब्ल्यूडीतील कार्यकारी अभियंत्यांचा उद्योग, निविदा ‘मॅनेज’ करणाऱ्या लिपिकाला ७ वर्षापासून ठेवले एकाच जागेवर

Delhi metro and PWD come together to construct integrated engineering marvel

दरम्यान, या प्रकरणात शेख व अंकुशराव अशा दोन अधिकाऱ्यांबद्दल संशय होता. परंतु गुन्हे शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांचा सहभाग नसल्याचे आढळून आले आहे. चौकशी अद्यापही सुरू असून चौकशीअंती या दोन्ही अधिकाऱ्यांचा सहभाग होता किंवा नाही, हे स्पष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी