30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
HomeराजकीयPolitics : दात पाडू, बघून घेऊ, ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना...

Politics : दात पाडू, बघून घेऊ, ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? ‘ते’ राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख? अतुल भातखळकरांचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई : दात पाडू, बघून घेऊ, ही रोड छाप भाषा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शोभते का? (Politics) ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख? बायका मुलांची धमकी कोणाला देता? मुख्यमंत्री आहात की माफिया, असा सवाल भाजपा नेते अतुल भातखळकरांनी उपस्थित केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. त्याआधी संजय राऊत यांनी ट्विटरवर मुलाखतीचा प्रोमो शेअर केला आहे. यावेळी संजय राऊत यांनी उद्या धमाका होणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे विरोधकांच्या सर्व आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असे नाव देण्यात आले आहे. यावरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीच्या प्रोमोमधील भाषा ही केवळ दुर्दैवी नसून महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी आहे. राज्याचे मुख्यमंत्री दात पाडणे, सुडाचे राजकारण, धमक्या देण्याची भाषा करतात हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेच्या विरोधातील आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत की गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख म्हणून बोलतायत अशा प्रकारची स्थिती आहे. मी त्यांना एवढंच सांगेन बायका मुले आम्हालाही आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या धमक्यांना घाबरू असे होत नाही,’ असे भातखळकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करावा, त्यांनी भाजपाला धमक्या देण्याच्या फंदात पडू नये, एवढेच सांगत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत यावर टीका केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी