33 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयरामदास कदम यांचे अनिल परबांविरोधात मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

रामदास कदम यांचे अनिल परबांविरोधात मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे माजी पर्यावरण मंत्री, शिवसेना नेते रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. (ramdas kadam wrote a letter to CM about anil parab)

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकण्याच्या तयारीत असतानाच रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या विरोधात पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहून तक्रार केली आहे.

पंकजा मुंडेंनी आपल्याच पक्षाचे कान टोचले

फरदीन खानचं बॉलिवूडमध्ये कमबॅक,रितेशसह प्रिया बापट झळकणार ‘या’ चित्रपटात

त्यामुळे रामदास कदम यांनी उघडपणे पत्राच्या माध्यमातून घेतलेल्या नडमनडी नंतर ‘मातोश्री’ आपल्या न्यायाचं दान रामदास कदम यांच्या पारड्यात टाकणार की अनिल परब यांना झुकतं माप देणार याकडे अवघ्या शिवसेनेचं लक्ष लागलेलं आहे.

शिवसेनेत नाराजी

रत्नागिरीतील दापोली येथील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या अनधिकृत रिसॉर्टच्या बाबतीत भाजपचे माजी खासदार आणि शिवसेनेचे विरोधक किरीट सोमय्या यांना अनिल परब यांच्या बेनामी, अवैध, आलिशान मालमत्तेबाबत इत्यंभूत माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिल्याचा ऑडिओ पुरावा समोर आला होता. अनिल परब यांनी तुरुंगात असलेल्या सचिन वाझेला १०० कोटी खंडणी वसूलीचं काम दिल्याचा जवाब वाझेने सीबीआयला दिला आहे. अशीही माहिती समोर आली होती.

कोकणातील आरटीआय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रामदास कदम यांनी ही सगळी माहिती किरीट सोमय्या यांच्यापर्यंत पोचवण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर रामदास कदम यांच्या बद्दल शिवसेनेमध्ये कमालीची नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात होणाऱ्या दसरा मेळाव्याला रामदास कदम उपस्थित राहणार की नाही याबद्दल मतमतांतरं सुरू आहेत.

निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान, संभाजी भिडेंची जीभ पुन्हा घसरली

Mumbai: Ramdas Kadam may not be invited for Shiv Sena’s Duss 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी