31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयपवारांनी आम्हाला 25 वर्षापूर्वी जे सांगितलं, ते दोन वर्षापूर्वी समजलं; राऊतांचा भाजपला...

पवारांनी आम्हाला 25 वर्षापूर्वी जे सांगितलं, ते दोन वर्षापूर्वी समजलं; राऊतांचा भाजपला टोला

टीम लय भारी

 मुंबई: भाजपला ऐक्य नको आहे, हे शरद पवारांनी 25 वर्षापूर्वी सांगितलं होतं. ते आम्हाला दोन वर्षापूर्वी समजलं. देश किती मागे चाललाय हे आता आम्हाला कळत आहे, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.(Raut slammed the BJP, said about sharad pawar)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘नेमकची बोलणे’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली. शरद पवार यांनी नेहमीच देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम केलं आहे. पवारांचे जे विचार 25 वर्षापूर्वी होते. ते आताही कायम आहेत. त्यांच्या विचारात काहीच बदल झालेला नाही. जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं हे पंताचं सरकार आहे. मुंबईतील जमिनी व्यापाऱ्यांना विकू नका असं त्यांनी म्हटलं होतं. मुंबईतील मराठी माणसांची पकड कमी होऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं, असं राऊत म्हणाले.

ठाकरे सरकारचे खमके पाऊल, पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रात आणणार ५ लाख कोटींची गुंतवणूक

नागालॅण्डमधील १४ नागरिकांच्या हत्येवरुन राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले…

आमच्याकडे खूप दारुगोळा
आमच्याकडे दारुगोळा खूप आहे, आम्ही तो वेळ आलो की फोडू. मी पवारांना दिल्लीत खुर्ची दिली. त्यावर टीका टिप्पणी होत आहे. मी पवारसाहेबांना खुर्ची का दिली हे समजायचं असेल तर त्यांची 61 भाषणं वाचली पाहिजे. 25 वर्षांपूर्वी त्यांनी सांगीतलं भाजपला ऐक्य नको आहे. आम्हाला ते 2 वर्षांपूर्वी समजले. देश किती मागे चाललाय हे आम्हाला आता कळू लागलं आहे. आज प्रश्न विचारणाऱ्यांची स्थिती काय आहे हे सर्वांना माहीत आहे, असं त्यांनी सांगितलं.

संजय राऊतांचे UPA मध्ये सहभागी होण्याचे संकेत

‘How could this happen?’: Sanjay Raut raises doubts over General Bipin Rawat’s chopper crash

मोदींना पुस्तक पाठवायला हवं
भाजप देशाचे तुकडे करत आहे. भाजप देशाला उलट्या दिशेने नेत आहे. हे पवारांनी 1996मध्ये सांगितलं होतं. ते आता आम्हाला कळू लागलं आहे. हे पुस्तक आपण मोदींना पाठवायला हवं. महाराष्ट्र हा देशाला विचार देत असतो. ‘नेमकची बोलणे’ हे पुस्तक पंतप्रधान मोदींना पाठवायला हवं, असं त्यांनी सांगितलं. या ग्रंथाला भगवा कलर घातला. मी आपला आभारी आहे. अवघा रंग एकची झाला. देशाचा महाराष्ट्राचा रंग भगवा आहे, असं राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी