30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयठाकरे कुटुंबियांसह मातोश्री बंगल्याच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात

ठाकरे कुटुंबियांसह मातोश्री बंगल्याच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात

गेल्या दोन तीन दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि शिंदे-फडणवीसांमधील वाकयुद्ध सुरु असताना आज ठाकरे गटाचे पदाधिकारी सुजित पाटकर यांच्यावर ईडीने कोविड घोटाळ्याप्रकरणी छापेमारी केली. हे सुरु असतानाच आज ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत देखील कपात केल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यासह मातोश्री बंगल्याच्या सुरक्षेत कपात केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झे़ड प्लस सुरक्षा होती. त्यात कपात केली असून त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या देखील कमी केली आहे. उद्धव ठाकरे यांना आता वाय प्लस सुरक्षा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तर माजी मंत्री आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केली आहे, त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, त्यात कपात करत आदित्य ठाकरेंना आता केवळ वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

या शिवाय उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र तेजस ठाकरे यांची सुरक्षा देखील कमी केली आहे. तसेच ठाकरे कुटुंबियांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगल्याची देखील सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. मातोश्री बंगल्याच्या पुढच्या आणि मागच्या गेटवर जी सुरक्षा व्यवस्था तैनात होती त्यामध्ये काही प्रमाणात कपात केल्याचे वृत्त आहे. याबाबत अधिकृतरित्या पोलिसांनी माहिती दिलेली नाही.

हे सुद्धा वाचा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या परदेश शिष्यवृत्तीसाठी धनंजय मुंडे आक्रमक; शिंदे-फडणवीसांना पाठवले पत्र

मुंबईसह राज्यात बरसणार पावसाच्या सरी; हवामान खात्याचा अंदाज

वैष्णवांची ओळख असणाऱ्या तुळशीमाळेचा बाजार चीन काबीज करतेय

दरम्यान ठाकरे गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यात गद्दारांचे सरकार आल्यानंतर आजपासून मातोश्रीच्या मुख्यव्दारापासून आतपर्यंत सुरक्षेत कपात केल्याचे त्यांनी म्हटले आहे. व्देश आणि घाणेरड्या राजकारणामुळे ही सुरक्षाव्यवस्था कमी केल्याचा आरोप करत हा प्रकार निंदनीय असल्याचे खासदार राऊतांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी