34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्ररोहित पवारांची भाजपवर टीका; संकट काळात तरी राजकारण करू नका

रोहित पवारांची भाजपवर टीका; संकट काळात तरी राजकारण करू नका

टीम लय भारी

मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती आणि कशी मदत केली, हे सांगायची आता वेळ नाही. योग्य वेळी ते जनतेला नक्की कळेल. सध्या राज्याला संकटातून बाहेर काढायची वेळ आहे. त्यासाठी विरोधी पक्षाचे नेते नक्कीच हातभार लावतील, ही अपेक्षा. विरोधी पक्षाला विनंती आहे की, किमान संकट काळात तरी राजकारण करू नका. सरकार पडणार नाहीच पण ते पडावं यासाठी आपण जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावेत, असा टोला लगावत संकटकाळी जनतेसोबत, सरकारसोबत उभं रहावं. महाराष्ट्र आपला सदैव ऋणी राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी म्हटले आहे.

आमदार रोहित पवार यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून कोरोना लसीकरण मोहिमेवर भाष्य करत विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेश आणि राज्याला मिळालेल्या कोरोना लसीच्या तुलनेबाबत केलेल्या विधानाचा रोहित पवार यांनी समाचार घेतला आहे. लस वितरण लोकसंख्येच्या आधारावर होत नसूनही विरोधक महाराष्ट्राची तुलना उत्तर प्रदेशशी करतायेत. केंद्र सरकारच्या गृहितकानुसार वेस्ट रेट हा १०% असू शकतो, पण आपण तो अवघा ३% ठेवला. राज्यातील रुग्णसंख्या बघता लस पुरवठा किती व्हावा, याचा विरोधकांनी विचार करावा, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

कोरोना लसीकरण (corona vaccination) आणि पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले असून राजकारण तापताना दिसत आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवत असून, पुरवठा योग्य प्रमाणात न झाल्यास लसीकरण मोहीम ठप्प पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यातच आता विरोधी भाजप आणि महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप फैरी झडताना दिसत आहेत. सरकार पडावं यासाठी जेवढे शर्थीचे प्रयत्न करत आहात, तेवढे राज्याच्या हितासाठी करावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे.

केंद्राने राज्याला ३-४ कोटी डोस एकत्र द्यावेत

 

महाराष्ट्राला १.०६ कोटी डोस मिळाले असून, आपण दोन्ही डोस मिळून ९३.३२ लाख लोकांचं लसीकरण पूर्ण केलं तर ३ लाख डोस वाया गेले. आपल्याकडे १० लाख डोस शिल्लक असून ते परवापर्यंत संपतील. आज काही ठिकाणी लसीचा साठा संपला. त्यामुळे लसीकरण ठप्प झालं. वास्तविक आपण लसीकरणाचा वेग वाढवलाय. लसीकरण केंद्रावर नोंदणी केल्यानंतर अवघ्या पाच-दहा मिनिटांत लस दिली जातेय. पण मागणीच्या प्रमाणात पुरवठा लस उपलब्ध नसल्याने लसीकरणामध्ये अडथळा निर्माण होतो, असे रोहित पवार यांनी सांगितले.

अशा परिस्थितीत लसीकरणाचा वेग अजून किती वाढवायचा? केंद्राकडून लसींचा पुरवठा वाढवून मिळावा यासाठी प्रयत्न करणं हे राजकारण आहे का? राज्याला तातडीने अधिक लस मिळाव्यात याला विरोध आहे का? या प्रश्नांची उत्तरं राज्याच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी द्यावीत, असे रोहित पवार म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी