34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयरोहित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका; खोटं बोलायची जुनी सवय आहे

रोहित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका; खोटं बोलायची जुनी सवय आहे

टीम लय भारी

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ सुरू झाली आहे. सततच्या वाढत्या महागाईमुळे सामान्य जनता त्रासून गेली आहे. काँग्रेसने राज्यभरात महागाईविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. परंतु भाजपाचे नेते पेट्रोल दरवाढीसाठी राज्य सरकारला जबाबदार धरत आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे (Rohit Pawar has sharply criticized Devendra Fadnavis).

इंधन भाववाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात, असे विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात बोलतांना केली होते. यावर रोहीत पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे हास्यास्पद विधान असल्याचे रोहित पवार म्हणाले (Rohit Pawar said that this was a ridiculous statement).

रोहित पवारांनी मानले केंद्र सरकारचे आभार

मोदी सरकार हे जुलमी सरकार आहे, नाना पाटोलेंचा खोचक टोला

“खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले 12 रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही,” अशी टीका आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

नाना पटोलेंच्या मागणीला यश; फोन टॅपिंग प्रकरणा संदर्भात समिती गठीत

Modi’s pick of Maharashtra leaders bears Fadnavis stamp, proves former CM’s clout

केंद्र सरकारचे अपयश लपवण्याचा प्रयत्न

“केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या 32.90 रुपयांपैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला 12 रुपये मिळत असल्याचे सांगता.”, असा टोला रोहित पवार यांनी फडणवीसांना लगावला आहे (Rohit Pawar has imposed such a toll on Fadnavis).

धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही

रोहित पवार म्हणाले, “विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी 12 रुपये दिसत असतील तर याला काय म्हणावे? सगळीकडे अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असे धडधडीत खोटे बोलणे कुठल्याही नेतृत्वाला शोभणारे नाही.”

Rohit Pawar has sharply criticized Devendra Fadnavis
रोहित पवार आणि देवेंद्र फडणवीस

आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर!

देशातील प्रमुख शहरांमध्ये वाढलेल्या किंमतीची आकडेवारी एएनआयने दिलेली आहे. त्यानुसार, दिल्लीमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अनुक्रमे 100.91 रुपये आणि 89.88 रुपये इतक्या झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत देखील पेट्रोल शंभरीपार असून प्रतिलिटर 106 रुपये 93 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 97 रुपये 46 पैसे इतकी किंमत झाली आहे. दुसरीकडे कोलकात्यामध्ये हेच दर अनुक्रमे 101.01 रुपये आणि 92.97 रुपये तर भोपाळमध्ये ते 109.24 रुपये आणि 98.67 रुपये इतके नोंदवण्यात आले आहेत.

 शहरनिहाय पेट्रोल-डिझेलच्या किंमती!

दिल्ली – पेट्रोल 100.91 रुपये आणि डिझेल 89.98 रुपये प्रतिलिटर
मुंबई – पेट्रोल 106.92 रुपये आणि डिझेल 97.46 रुपये प्रतिलिटर
चेन्नई – पेट्रोल 101.67 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रतिलिटर
कोलकाता – पेट्रोल 101.01 रुपये आणि डिझेल 92.97 रुपये प्रतिलिटर
बंगळुरू – पेट्रोल 104.29 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रतिलिटर
लखनऊ – पेट्रोल 98.01 रुपये आणि डिझेल 90.27 रुपये प्रतिलिटर
पटना – पेट्रोल 103.18 रुपये आणि डिझेल 95.46 रुपये प्रतिलिटर
भोपाळ – पेट्रोल 109.24 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रतिलिटर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी