31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयराणेंच्या टीकेला विनायक राऊत यांचे सडेतोड उत्तर

राणेंच्या टीकेला विनायक राऊत यांचे सडेतोड उत्तर

टीम लय भारी

मुंबई :- केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रिपद मिळाले आहे. मात्र यानंतर शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात टीकास्त्र सुरू झाले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे (Vinayak Raut unequivocal answer to Rane criticism).

राणेंना सूक्ष्म उद्योग मंत्री करा, अतिवरिष्ठ मंत्री करा किंवा थेट पंतप्रधान करा, शिवसेनेला दुःख वाटण्याचे कारण नाही. भाजपला राणेंना मंत्रिपद द्यायचे होते, ते त्यांनी दिले, आता तिथे सुखाने रहा. त्या खुर्चीवर बसून पूर्वीच्या स्वभावाप्रमाणे अजून कोणाला दुखवू नका” असा टोला विनायक राऊतांनी लगावला आहे (Such a toll has been imposed by Vinayak Raut).

संजय राऊतांच्या नारायण राणेंना शिवसेनेच्या भाषेत शुभेच्छा

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला

नारायण राणे यांचा शिवसेनेकडे आणि खास करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टीकोन आहे, तो आजही बदललेला नाही, याच गोष्टीचे दुःख वाटते” अशी खंत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली (The grief was expressed by MP Vinayak Raut).

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांची नुकतीच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रिपदी वर्णी लागली. पदभार स्वीकारताना राणेंनी नोंदबुकमध्ये ‘ओम श्रीगणेशा’ लिहित नवीन सुरुवात केली, त्याचबरोबर त्यांनी सेनेविरोधातही श्रीगणेशा केला. पदभार स्वीकारलेल्या खुर्चीवरुनच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पहिला वार केला.

Vinayak Raut unequivocal answer to Rane criticism
नारायण राणे आणि विनायक राऊत

रोहित पवारांची फडणवीसांवर खोचक टीका; खोटं बोलायची जुनी सवय आहे

Narayan Rane Made Union Minister Only To Target Us: Shiv Sena

नारायण राणे यांना पत्रकारांनी प्रश्न केला की, पदभार स्वीकारल्यानंतर आपल्याला सर्वांनी शुभेच्छा दिल्या, मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या नाहीत, असा प्रश्न विचारल्यावर, नारायण राणे म्हणाले की, मला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या पण उद्धव ठाकरेंनी शुभेच्छा दिल्या नाहीत. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एवढ्या मोठ्या मनाचा नाही’, असे म्हणत राणेंनी मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच उद्धव यांच्यावर टीकेचा पहिला बाण सोडला (Rane fired the first arrow of criticism at Uddhav when he became a minister).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी