30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयराहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याला विरोध करणाऱ्या बावनकुळेंना रोहित पवार म्हणाले, तु्म्हाला अधिकार...

राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याला विरोध करणाऱ्या बावनकुळेंना रोहित पवार म्हणाले, तु्म्हाला अधिकार आहे का ?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असुन ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र राहुल गांधी यांनी मोदी आडनावावरुन ओबीसींचा अपमान केल्याचे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी माफी मागावी अन्यथा त्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नसल्याचे म्हटले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी बावनकुळेंवर निशाणा साधत भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला तेव्हा तुम्ही अवाक्षरही का काढले नाही. आपल्या सिलेक्टेड आणि राजकीयदृष्ट्या सोयीच्या भूमिकेमुळे आपणास हा अधिकार आता आहे का, असा प्रश्न माझ्यासारख्या नागरिकास पडल्याशिवाय रहात नाही, असे म्हटले आहे.

रोहित पवार यांनी ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही महापुरुषाचा अवमान करणं चुकीचंच आहे. पण एका भोंदूबाबाने श्री साईबाबा आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा अवमान केल्यानंतर आणि भाजपच्या एका प्रवक्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी अवाक्षरही काढलं नाही. उलट त्या भाजपच्या प्रवक्त्याचं राज्यात स्वागत केलं आणि तेच बावनकुळे साहेब आज राहुल गांधींना माफी मागण्यास सांगत आहेत. पण बावनकुळे साहेब आपण हीच भूमिका जर सर्वच महापुरुषांबाबत घेतली असती तर राहुल गांधी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आपणास होता. पण आपल्या सिलेक्टेड आणि राजकीयदृष्ट्या सोयीच्या भूमिकेमुळे आपणास हा अधिकार आता आहे का, असा प्रश्न माझ्यासारख्या नागरिकास पडल्याशिवाय रहात नाही.


हे सुद्धा वाचा 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा

“व्हीजेटीआय” म्हणजे, १३६ वर्षांच्या गौरवशाली परंपरेची भन्नाट कहाणी…!

राहुल गांधी आता आई सोनिया गांधींसोबत राहणार?

राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील एक सभेत मोदी आडनावावरुन एक वक्तव्य केले होते. या प्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा कोर्टाने सुनावली असून, राहुल गांधी यांची खासदारकी देखील रद्द करण्यात आली आहे. दरम्यान राहुल गांधी महाराष्ट्रात येणार असुन ते उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. या पर्श्वभूमीवर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचा नव्हे तर, संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केला आहे, त्यामुळे आज ओबीसी समाज रस्त्यावर आला आहे, राहुल गांधींनी कोर्टाचा निर्णय मान्य केला परंतू जनतेच्या कोर्टात त्यांनी माफी मागितलेली नाही. राहुल गांधी जोपर्यंत माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी