33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeव्हिडीओडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा

तब्बल 125 फूट उंच असा हा कांस्य धातूचा पुतळा आहे. आंबेडकर जयंतीच्या दिवशी भीमसैनिकांना ही खास भेट मिळाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात तळमजल्यावर 15,200 चौरस फूट बांधकाम आहे. टेरेस फ्लोअर 2,200 चौरस फुटाचा असून एकूण बांधलेले क्षेत्र 26,258 चौरस फूट आहे. 450 कार पार्किंगसाठी पार्कींग हबही आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील सर्वात उंच पुतळा उभारला गेला आहे. 2017 पासून सुरू असलेले हे काम पूर्णत्वास गेले. 132व्या आंबेडकर जयंतीदिनी या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. तब्बल 125 फूट उंच असा हा कांस्य धातूचा पुतळा आहे. आंबेडकर जयंतीच्या दिवशी भीमसैनिकांना ही खास भेट मिळाली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात तळमजल्यावर 15,200 चौरस फूट बांधकाम आहे. टेरेस फ्लोअर 2,200 चौरस फुटाचा असून एकूण बांधलेले क्षेत्र 26,258 चौरस फूट आहे. 450 कार पार्किंगसाठी पार्कींग हबही आहे.

 

हैदराबादमध्ये हा बाबांसाहेबांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. पद्मभूषण पुरस्कार प्राप्त पुतळ्याचे शिल्पकार 98 वर्षीय राम सुतार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांना कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. NTR गार्डनमध्ये बुद्ध पुतळ्याच्या समोरच हा बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. तेलंगणा हुतात्मा स्मारकाशेजारी  राज्य सचिवालयाच्या शेजारीच हा पुतळा उभारण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : 

सुप्रिया सुळे आणि सुजात आंबेडकर यांची चैत्यभूमीवर भेट होते तेव्हा

काँग्रेस बदलली; आता नेहरूंबरोबरच आंबेडकर, बोस यांनाही स्थान; खर्गे तर सोनियांपेक्षाही मोठे!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्थिस्तूप म्हणजे अखंड ऊर्जेचा स्रोत

Tallest Statue of Babasaheb Ambedkar, Dr Ambedkar Statue, Ram Sutar, NTR Garden, Hyderabad

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी