31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयसदाभाऊ खोत यांनी घेतली 'राज'पुत्राची भेट !

सदाभाऊ खोत यांनी घेतली ‘राज’पुत्राची भेट !

टीम लय भारी

नाशिक : माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी नाशिक दौऱ्याच्या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली (Sadabhau Khot met Amit Thackeray).

पंचायती राज समिती दौऱ्यावर सदाभाऊ खोत यांनी अमित ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सदाभाऊ खोत यांनी अमित ठाकरे यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा केली. तसेच मनसेचे मनसैनिक जसे बाकीचे मुद्दे उचलून धरतात तसे राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न देखील उचलून घ्यावा अशी सदाभाऊ खोत यांनी अमित ठाकरेंना विनंती केली आहे (Sadabhau Khot has requested Amit Thackeray).

सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला ‘मौलिक’ सल्ला

मनसेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची नियुक्ती, मनसेच्या नवा झेंड्याचेही अनावरण

Sadabhau Khot met Amit Thackeray
पंचायती राज समिती दौऱ्यावर सदाभाऊ खोत यांनी अमित ठाकरेंची घेतली भेट

चोर चोर मावसभाऊ, अर्ध अर्ध वाटून खाऊ : सदाभाऊ खोत

Maharashtra: BJP’s Chandrakant Patil meets MNS chief Raj Thackeray

राज ठाकरे शेतकऱ्यांना नक्कीच न्याय देतील. असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे. सदाभाऊ खोत आणि अमित ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. कोणतेही सरकार कायम नसते. लोक बघत असतात कोण काम करतेय आणि कोण नाही. लोक सूज्ञ असतात, असे म्हणत अमित ठाकरे यांनी नाशिकच्या मैदानात पहिली गर्जना केली.

नाशिकमध्ये कांदा, टॉमेटो आणि इतर अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे आहेत. मनसेने त्यासाठी शेतकऱ्यांच्या बाजूने विचार करावा आणि त्यासाठी आक्रमक भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आपण लक्ष घालून प्रसंगी आंदोलन उभारून शेतकऱ्यांना दिलासा देणेबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी अमित ठाकरे यांना सांगितले. तसेच मनसेने शेतकऱ्यांच्या हितासाठी आक्रमक पवित्रा घ्यावा (MNS should take aggressive stance for the benefit of farmers).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी