29 C
Mumbai
Friday, May 19, 2023
घरराजकीयअन् मुख्यमंत्री शिंदे थेट मनसे कार्यालयात; राजकीय चर्चेला उधान!

अन् मुख्यमंत्री शिंदे थेट मनसे कार्यालयात; राजकीय चर्चेला उधान!

राज्यात ठाकरेसह महाविकास आघाडीच्या विरोधात असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसह भाजप एकमेकावर चांगलीच टीका टिपण्णी करताना दिसत आहे तर आज शिवाजी पार्कवर मनसेचा पाडवा मेळावा होणार आहे. मनसैनिकांकडून पाडवा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दुसरीकडे पाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट दिली आहे. (CM Eknath Shinde at MNS office)
मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Cm eknath shinde met to mns leader raju patil in dombivli mns office
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीमधील मनसेच्या कार्यालयात भेट दिली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंबिवलीमधील मनसेच्या कार्यालयात आले होते. मुख्यमंत्र्यांनी विनंतीला मान दिला. ते कार्यालयात आल्यानं आनंद झाला. हिंदुत्वाचा विचार आमचा सुरुवातीपासूनच आहे. आता याही पक्षाचा विचार हा हिंदुत्वाचा आहे, असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान युतीबाबत सूचक विधान दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट दिल्यानं पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका निवडणुकांसाठी युती होणार का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. यावर देखील राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वांनी एकत्र यावे का हा निर्णय राज साहेब घेतील, मात्र माझे व्यक्तीगत मत म्हणाल तर कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. स्वतंत्र लढलो तर कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, पण राज साहेब बोलले तर एकत्र येऊ असं सूचक विधान राजू पाटील यांनी केलं आहे.

व्हिडियो पाहण्यासाठी पुढील लिंक तपासा : Eknath Shinde यांनी दिली मनसे कार्यालयाला भेट #rajthackeray #eknathshinde

हे सुद्धा वाचा :

मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंची विरोधकांवर जोरदार टोलेबाजी; भाजपलाही दिला इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनी आज ठाण्यात होणार ‘राजगर्जना’

मनसे कार्यकर्त्यांमुळे उत्तर भारतीयांना त्रास, पण आता ते दिवस संपले…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी