30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeराजकीयवार होते कडवट, जिव्हारी आणि तेवढेच विखारी...; सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचे ट्विट

वार होते कडवट, जिव्हारी आणि तेवढेच विखारी…; सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचे ट्विट

शिवसेनेत फुट पाडून एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर मिळून नवीन सरकार स्थापन केले. आज 30 जून रोजी शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती होत आहे. वर्षभरापूर्वी विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले. 40 आमदारांना समर्थन काढून घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनाम द्यावा लागला. यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल. आज या सरकारला एकवर्ष पूर्ण होत आहे. वर्षपूर्ती निमित्त शिवसेनेने त्यांच्या अधिकृत ट्विटवर अकाऊंट वरुण एक ट्विट केल आहे.

शिंदेनी शिवसेनेत फुट पाडल्यानंतर ठाकरे गटाने शिवसेनेची सर्व सोशल मीडिया खाती स्वत: कडे ठेवली होती त्यामुळे शिंदे गटाच कोणतही अधिकृत सोशल मीडिया खात नव्हत. शिवसेनेच्या (शिंदे गट) वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी शिवसेनेच अधिकृत सोशल मीडिया खात लॉन्च केले. याच सोशल मीडिया खात्यावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ट्विट करण्यात आले आहे. “महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, प्रखर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना…., आशीर्वाद शिवछत्रपतींचे एक वर्ष सुराज्याचे..”असे ट्विट करण्यात आले आहे.

या ट्विट मध्ये एक विडियो सुद्धा पोस्ट करण्यात आला आहे.“संघर्ष होता प्रत्येक वाटेवर,आणि प्रत्येक वाट होती रोखलेली, वार होते कडवट, जिव्हारी आणि तेवढेच विखारी. पण एकाकी लढाई होती, देव, देश आणि धर्मासाठी म्हणून फडकला भगवा वादळातही. नेतृत्त्वाने कवेत घेतला अवघा आसमंत संपवले दरबारी राजकारण आणि गहिवरून गेले जनमन. सुरू झाला प्रत्यक्ष गतिमान कारभार, विकासाची दिसली दिशा, महाराष्ट्राच्या समृद्धीची उजळली भाग्यरेषा. सुराज्याच्या उदयाने आली वेगवान कारभाराची प्रचिती, जनतेच्या सरकारची झाली वर्षपूर्ती. शिवछत्रपतींचा हाच विचार, हिंदूहृदयसम्राट हाच आदर्श, धर्मवीरांची हीच शिकवण या महाराष्ट्राच्या स्वाभीमानासाठी प्रखर हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी सज्ज पुन्हा शिवसेना, सज्ज पुन्हा शिवसेना”, असे बोल या व्हिडीओमध्ये आहेत. या व्हिडिओमध्ये शिंदेनी बंडखोरी केल्यापासून आज पर्यंतमहत्वाचे क्षण अधोरेखित करण्यात आले आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार ने वर्षभरात केलेली कामे

शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 11 महिन्यात 14 हजार 78 शासन निर्णय (जीआर) घेतले. या निर्णयांमध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा केली गेली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट मदत करण्यासह शेतकऱ्यांना 1 रुपयात विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. महिलांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकीटामध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली. महिलांचे 25 हजारूपायांचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त करण्यात आले. अशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक तसेच अंगणवाडी सेविकांचे व मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवण्यात आले. मुलींसाठी ‘लेक लाडकी’ ही योजना सुरू करण्यात आली. शिधाधारकांना दिवाळी भेट, पेट्रोल-डिझेल च्या दरात कपात, अतिवृष्टी व पुरग्रस्थाना प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय, मुलांना मोफत गणवेश, कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय,संजय गांधी, श्रावण बाळ योजनेतील निवृत्तीवेतणाची वाढ करण्यात आली.

पायाभूत सुविधांमध्ये समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, एमटीएचएल, कोस्टल रोड लोकउपयोगी प्रकल्प. नागपूर-गोवा एक्सप्रेस मार्ग तयार करण्याचा निर्णय, खालापूर ते सिहंगड भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. त्याच बरोबर बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्याना मतदानाचा अधिकार देण्यात आला. सरपंचाची निवास थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हापरिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 करण्यात आली. धनगर समाजासाठी 1 हजार कोटींची घोषणा आणि दहा हजार कोटींच्या बिनव्याजी कर्जाची सोय, अश्या अनेक योजना राबवण्यात आल्या.

हे सुद्धा वाचा :

ईडी सरकारच्या काळात गुन्हेगार मोकाट; नाना पटोले यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

सदाशिव पेठ तरुणी हल्ला प्रकरण; हल्लेखोराला चार दिवसांची पोलीस कोठडी

धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचा विनयभंग, मुंबईची लाईफलाईन महिलांसाठी असुरक्षित

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी