28 C
Mumbai
Tuesday, September 12, 2023
घरराजकीयशिंदे सरकार कॅसिनो सुरू करणार; पावसाळी अधिवेशनात विधायक मांडण्याची शक्यता

शिंदे सरकार कॅसिनो सुरू करणार; पावसाळी अधिवेशनात विधायक मांडण्याची शक्यता

राज्यात आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (17 जुलै) सुरू झाले आहे. हे अधिवेशन 17 जुलै पासून 4 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात सरकारकडून मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील पर्यटनस्थळी लवकरच कॅसिनो सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे अशी माहिती मिळत आहे.

या पावसाळी अधिवेशनात शिंदे- फडणवीस- पवार सरकारकडून अधिवेशनात 24 विधेयके आणि 6 अध्यादेश मांडले जाणार आहेत. यामध्ये राज्यात कॅसिनो सुरू करण्याच विधेयक असल्याची माहिती मिळत आहे. कॅसिनो सूरु करण्यासाठी लागणारे परवाने, अटीशर्ती असलेले विधेयक आणून कॅसिनोसाठी परवानगी मिळावी म्हणून सरकार प्रयत्न करत असल्याचे समजत आहे.

व्यावसायिक मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात कॅसिनो आणण्याची मागणी करत आहेत. याबरोबरच मनसे कडूनही कॅसिनोसाठी मागणी होत आहे. मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यात कॅसिनो सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यात महसूल वाढ करण्यासाठी आणि रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर सरकारने राज्यात कॅसिनो सुरू करण्याचा विचार करावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा:

सिलेसिया डायमंड लीगमध्ये अविनाश साबळे 6 व्या स्थानी, पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरला पात्र

शरद पवारांच्या मनातलं आम्ही काय सांगावं; प्रफुल पटेलांची अगतिकता

गोऱ्हे, कायंदे आणि बाजोरियांच्या अडचणीत वाढ; शिवसेना उद्धव ठाकरे गटाने बजावली अपात्रतेची नोटीस

महाराष्ट्रात कॅसिनो कायदा 1976 पासून सुरू करण्यात आला आहे. परंतु अजूनही त्याची अमलंबजावणी झालेली नाही. देशात कॅसिनो कायदा लागू नसल्याने राज्याच्या जवळपास 3 ते 3.50 हजार कोटींचा व्यवसाय बुडत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच कॅसिनो कायदेशीर केल्यास बेकायदेशीर कॅसिनो नष्ट होण्यास मदत होईल आणि राज्यातील पर्यटनाला चलना मिळण्यास मदत होईल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी