33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयशिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेना भाजप महायुतीचा शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि नाशिक मतदारसंघासाठी हेमंत गोडसे यांनी भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार राहुल आहेर, माजी मंत्री बबन घोलप, आमदार राहुल ढिकले, शिवसेनेचे अजय बोरस्ते आदी नेते उमेदवारांसोबत रथावर उपस्थित होते. या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आला आला पाठीराखा हेमंत आप्प्पा ,छत्रपती शिवाजी महाराज कि जय, मोदी मोदी आदी घोषणा दिल्या जात होत्या.

लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि नाशिक मतदारसंघासाठी हेमंत गोडसे यांनी भव्य रॅली काढत शक्ती प्रदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार राहुल आहेर, माजी मंत्री बबन घोलप, आमदार राहुल ढिकले, शिवसेनेचे अजय बोरस्ते आदी नेते उमेदवारांसोबत रथावर उपस्थित होते. या रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आला आला पाठीराखा हेमंत आप्प्पा ,छत्रपती शिवाजी महाराज कि जय, मोदी मोदी आदी घोषणा दिल्या जात होत्या.(Shiv Sena files nomination in a show of strength for BJP-BJP alliance )

भालेकर मैदानापासून दुपारी एक वाजेच्या सुमारास या रॅलीला प्रारंभ झाला. रणरणत्या उन्हात निघालेल्या या प्रचार फेरीत उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. महायुतीने नाशिक, दिंडोरी मतदार संघातील उमेदवारांचे अर्ज एकत्रितपणे दाखल करण्याचे ठरवले होते. त्यानुसार बी. डी. भालेकर मैदानावर सकाळी १० वाजल्यापासून दोन्ही पक्षांचे तसेच मित्र पक्षांचे, पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले होते. पक्षांचे झेंडे आणि कमळ व धनुष्य ही निशाणी अनेकांच्या हाती होती. प्रारंभी सर्वच प्रमुख नेत्यांनी आणि दोन्ही उमेदवारांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, त्यानंतर रॅलीला प्रारंभ झाला. बी.डी. भालेकर मैदानावरून निघालेली ही रॅली पोस्ट ऑफिस, गंजमाळ सिग्नल, शालिमार चौक, परशुराम सायखेडकर सभागृह मार्गे, रेडक्रॉस सिग्नल, एमजी रोड, मेहर सिग्नल मार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात गेली.

आदिवासी नृत्य आणि गर्दी
बी. डी . भालेकर मैदान येथून महायुतीच्या रॅलीस सुरुवात झाली. रॅलीच्या सुरुवातीला आदिवासी नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रॅली बी.डी ,भालेकर मैदान येथून अण्णाभाऊ साठे पुतळा चौक, खडकाळी सिग्नल, शालिमार, नेहरू उद्यान, रेडक्रॉस सिग्नल चौक , महात्मा गांधी रोड या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेली यावेळी सर्वच ठिकाणी आदिवासी नृत्य करणारे बांधव नागरिकाचे लक्ष वेधून घेत होते.

विक्रेत्यांची चांदी
रॅलीसाठी सकाळी १० वाजताची वेळ देण्यात आली होती. त्यामुळे अकरा वाजेपासूनच बि . डी. भालेकर मैदानाकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलले होते. शिवसेना, भाजप, मनसे आणि आरपीआय सह मित्रपक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे एक वाजेपासून तीन वाजेपर्यंत रॅली मार्गावरील सर्वच रस्ते गर्दीने फुलले होते. या रॅलीने आणि कडाक्याच्या उन्हाने या मार्गावरील सर्वच हॉटेल व्यवसायीक आणि छोट्या मोठ्या विक्रेत्यांची चांदी झाली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी